Maa Laxmi Upay : सनातन धर्मात मां लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटलं जातं. भारताच्या काही ठिकाणी माँ लक्ष्मी किंवा धन लक्ष्मी म्हणतात. देवी लक्ष्मी यांचा स्वभाव चंचल मानला जातो. माँ लक्ष्मी ज्या घरात प्रवेश करते त्या घरात कधीही भौतिक सुखांची किंवा पैशाची कमतरता नसते. प्रत्येक व्यक्ती देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याच्या प्रयत्नात करते असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रामध्ये, माँ लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याचा प्रयत्न करून तुम्ही देवी लक्ष्मीचा आशिर्वाद घेऊ शकता. जाणून घेऊया हे उपाय कोणते आहे. 


माँ लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काय उपाय कराल ( Upay To Get Maa Lakshmi Blessing )


रविवारच्या दिवशी घरी आणा कुशमूल


धार्मिक विद्वानांच्या मते, माँ लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी (Upay To Get Maa Lakshmi Blessing) रविवारी पुष्य नक्षत्रात कुशमूल घरी आणावं. यानंतर गंगेच्या पाण्याने धुऊन त्याला शुद्ध करा. त्यानंतर घरातील मंदिरात देवतेच्या रूपात त्याची प्रतिष्ठापना करा. यानंतर विधिवत पूजा सुरू करा. यानंतर कुसुम लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे माँ लक्ष्मी प्रसन्न होते.


दररोज माँ लक्ष्मीची पूजा करा


ज्या घरांमध्ये रोज माँ लक्ष्मीची आरती करण्यात येते त्या घरी पैशाचा ओघ वाढतो. त्यामुळे दररोज माँ लक्ष्मी यांची पुजा करावी. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. यावेळी आजार भरपूर दूर राहून पैसा देखील भरपूर येतो. 


आर्थिक संकटं या उपायाने होती दूर


आर्थिक संकटाशी झुंजत असाल तर माँ लक्ष्मी तुम्हाला मदत करू शकतात. वास्तविक मां लक्ष्मी फक्त त्या घरांमध्ये वास करतात, ज्या ठिकाणी स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यामुळे आर्थिक संकटातून वाचण्यासाठी दररोज स्वच्छता करा 


या गोष्टी माँ लक्ष्मींना करा अर्पण


माँ लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी तिची पूजा करा. यावेळी लक्ष्मीला खीर-बतासे आणि गुलाबाचा अत्तर अर्पण करा. यासोबतच कमळाचं फूल, मखाणे, शंख अर्पण करणंही देखील शुभ मानलं जातं. हे सर्व उपाय केल्यास माँ लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि पैशांची चणचण भासणार नाही. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )