Magh Gupt Navratri 2023 Upay : आजपासून माघ महिन्यातील गुप्त नवरात्री सुरुवात झाली आहे. वर्षभरात आपण 5 नवरात्री साजरी करतो. चैत्र नवरात्र, शरद नवरात्र, पौष गु्प्त नवरात्र, आषाढ गुप्त नवरात्र आणि माघ गुप्त नवरात्र...यावर्षी चैत्र नवरात्र 22 मार्च 2023 पासून 31 मार्च 2023  असणार आहे. ही वसंत नवरात्री म्हणून ओळखळी जाते. या नवरात्रीला हिंदू नवीन वर्षाची सुरुवात असं म्हणतात. तर संपूर्ण भारतात साजरी होणारी शरद नवरात्र यावर्षी 15 आक्टोबर  2023 पासून 24 आक्टोबरपर्यंत  2023 असणार आहे. पण गुप्त नवरात्री आणि शरद नवरात्रीमध्ये काय फरक आहे हे अनेकांना माहिती नाही. आज आपण त्याबद्दल जाणून घेऊयात. नवरात्रीचा काळ माँ दुर्गेच्या उपासनेसाठी सर्वात शुभ मानला जातो. असं मानलं जातं की गुप्त नवरात्रीमध्ये माँ दुर्गेची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि संकटांपासून मुक्ती मिळते.


गुप्त नवरात्री 2023 शुभ मुहूर्त (Gupt Navratri 2023 Shubh Muhurat)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 जानेवारीला पहाटे 2.22 मिनिटांपासून शुभ काळ सुरु होतो आणि रात्री 10.27 ला संपतो. 


कलश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त - 22 जानेवारी दुपारी 12.15 ते 12.22 पर्यंत


गुप्त नवरात्री सामान्य नवरात्रीपेक्षा कशी वेगळी?


चैत्र आणि अश्विन महिन्यात येणारी नवरात्र ही सर्वसामान्य लोक मोठ्या उत्साहात साजरी करतात. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कन्यापूजन आणि कन्याभोजन केलं जातं. तर दुसरीकडे, गुप्त नवरात्रीमध्ये साधनेला विशेष महत्त्व आहे. सामान्य नवरात्रीमध्ये माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तर गुप्त नवरात्रीमध्ये महाविद्यांमध्ये पूजा केली जाते. (magh gupt navratri 22 january 2023 shubh muhurat  What is the difference between gupt navratri chetra navratri shardiya navratri in marathi)


- असं मानलं जातं की गुप्त नवरात्रीमध्ये भगवान विष्णू निद्राकाळात असतात. मग अशा स्थितीत देवतांची शक्ती कमकुवत होऊ लागते. त्याच वेळी रुद्र, यम, वरुण इत्यादींचा प्रभाव पृथ्वीवर वाढू लागतो. या आपत्तींच्या रक्षणासाठी गुप्त नवरात्रीत 10 महाविद्यांची पूजा केली जाते. तांत्रिक विधी, शक्ती साधना आणि महाकाल इत्यादींशी संबंधित लोकांसाठी गुप्त नवरात्र विशेष आहे. 


सामान्य नवरात्री आणि गुप्त नवरात्रीमध्ये पूजल्या जाणार्‍या देवी 


चैत्र आणि अश्विनच्या नवरात्रीमध्ये, माँ दुर्गेची नऊ रूपांमध्ये पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री.


गुप्त नवरात्रीमध्ये उपासक काली, तारा, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, चिन्नमस्ता, भैरवी, ध्रुमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला देवीची पूजा तंत्र साधनेसाठी करतात.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)