Maha Lakshmi yoga : ज्योतिष विद्येच्या अनुशंगाने 18 जून रोजी शुक्र ग्रह आपल्याच राशीमध्ये म्हणजेच वृषभ गोचर करणार आहे. बुध ग्रह आधीपासूनच वृषभ राशीमध्ये होता. अशा परिस्थितीत 18 जूनपासून बुध आणि शुक्र वृषभ राशीमध्ये युती करताना दिसतील. (Maha Lakshmi yog importance significance budh shukr zodiac sign)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धन आणि आनंदाचा धनी असणाऱ्या शुक्र आणि बुद्धि- संपत्ती- व्यापार यांचा धनी असणाऱ्या बुध ग्रहाचं मिलन काही लोकांसाठी अतिशय शुभ सिद्ध होणार आहे. या ग्रहांच्या युतीमुळं महालक्ष्मी योग तयार होत आहे. 


ज्योतिषविद्येमध्ये महालक्ष्मी योग अतिशय शुभ मानला जातो. सर्वच राशींवर या योगाचे परिणाम दिसणार आहेत. पण, 3 राशींसाठी मात्र तो अधिक लाभदायी ठरणार आहे. 


कोणत्या राशींना होणार 'महालक्ष्मी योग'चा फायदा? 
मेष- या राशीसाठी महालक्ष्मी योग एक वरदान ठरणार आहे. अचानकच या व्यक्तींना धनलाभ होणार आहे. धोक्याच्या गुंतवणुकीतही फायदा मिळणार आहे. नोकरदार वर्गाला पगारवाढ मिळणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. 


कर्क- कर्क राशीसाठी महालक्ष्मी योग शुभ ठरणार आहे. काही कामांमध्ये बदल करण्याची गरज आहे. अर्थार्जन वाढवण्याची संधी आहे. व्यापाऱ्यांनाही लाभ होणार आहे. एखादा मोठा व्यवहार करण्याची संधी तुम्हाला आहे. 


सिंह- बुध-शुक्र युती तुम्हाला चांगलीच फळणार आहे.  नोकरीच्या ठिकाणी याचा लाभ दिसून येईल. प्रगतीच्या वाटेतले अडथळे दूर होणार आहेत. व्यावसायिकांना नफा मिळणार आहे. एकंदरितच नशीब पालटण्याचीच ही संधी आहे. 


(सर्वसामान्य मान्यतांवर वरील माहिती आधारलेली आहे. हा ज्याचात्याचा विश्वासाचा विषय, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)