Shukra Mangal Yuti 2024 Make Mahalaxmi Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो. तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांच्या या स्थिती बदलामुळे अनेक वेळा शुभ आणि अशुभ असे योग निर्माण होतात. अगदी अनेक वेळा एखाद्या राशीत ग्रहांच्या मिलनातून राजयोगाची निर्मिती होते. होळीपूर्वी कुंभ राशीत वैदिक ज्योतिषशास्त्रातील अतिशय शुभ असा महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. कुंभ राशीत गेल्या वर्षी 7 एप्रिलला धन आणि वैभवचा दाता शुक्राने प्रवेश केला आहे. आता येत्या 15 मार्चला ग्रहांचा सेनापती मंगळ कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. अशा स्थितीत कुंभ राशीत शुक्र आणि मंगळाचा संयोगातून महालक्ष्मी राजयोग निर्माण होतो आहे. या महालक्ष्मी राजयोगामुळे काही राशींना होळीपूर्वीच अचानक आर्थिक फायदा होणार आहे. (Mahalakshmi Rajyog through conjunction of Mars and Venus before Holi financial gain for these zodiac sign )


महालक्ष्मी राजयोगामुळे 'या' राशी होणार धनवान!


मेष राशी (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महालक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. तसंच यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळणार आहे. तसंच या लोकांच्या संपत्तीतही वाढ होणार आहे. व्यवसायात पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत. या काळात तुम्ही कोणतेही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करणार आहात. यावेळी कुटुंबातील वातावरण प्रसन्न असणार आहे. तुमच्या बोलण्यात प्रभाव इतरांवर पाडण्यात तुम्ही यशस्वी ठरणार आहे. 


मिथुन राशी (Gemini Zodiac)


महालक्ष्मी राजयोग तयार झाल्याने मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहे . या काळात व्यावसायिकांना चांगला नफा मिळणार आहे. दुसरीकडे, जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्ही मोठी डील करणार आहात. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तसंच यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहे. या काळात तुम्ही काही नवीन काम सुरू करु शकता. यावेळी, नशीब देखील तुमच्या बाजूने असणार आहे. तुमची प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. 


वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)  


महालक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद असणार आहे. पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित तुमच्या योजना यशस्वी होणार आहे. त्याच वेळी नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळणार आहे. तसंच, पदोन्नती आणि इच्छित ठिकाणी बदली होणार आहे. या काळात तुम्ही काही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करणार आहात. यावेळी, आपण काम किंवा व्यवसायाशी संबंधित देश आणि परदेशात देखील प्रवास करणार आहात. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)