Mahalaxmi Rajyog 2023 : एका ठराविक वेळेनंतर ग्रह आणि नक्षत्र आपली स्थिती बदलत असतात. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या राशीत जर दुसरा ग्रह असल्यास काही योग जुळून येतात. काही योग हे शुभ असतात तर काही अतिशय अशुभ असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात गतीने आपली स्थिती बदलतो तर शनि हा सर्वात धिम्या गतीने आपलं स्थान बदलतो. कुंडलीत चंद्र हा इतर ग्रहांशी युती करतो. कृष्ण पक्षात चंद्र आणि मंगळाची भेट (Chandra Mangal Yuti)होणार आहे. या भेटीमुळे महालक्ष्मी राजयोग जुळून आला आहे.


चंद्र - मंगळ युती कधी? (Chandra Mangal Yuti)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार येत्या 20 जूनला चंद्र मिथुन राशीतून दुपारी 3 वाजून 58 मिनिटांनी कर्क राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे 20 जून ते 23 जून दरम्यान  काही राशींच्या लोकांचं नशिब चंद्रासारखं चमकणार आहे. (mahalaxmi rajyog 2023 formed due to Chandra Mangal Yuti in Cancer june 20 to june 23 three zodiac signs get a lot of money)


'या' राशींना बरसणार लक्ष्मीची कृपा


कन्या (Virgo)


चंद्र आणि मंगळ युतीमुळे कन्या राशीच्या कुंडलीतील दहाव्या घरात महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. कुंडलीतील दहावं घर हे करिअर आणि व्यवसायाशी संबंधित आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात धनलाभाचे योग आहेत.  नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. नवीन प्रकल्पाचे योग आहेत. 


मिथुन (Gemini)


मिथुन राशीच्या कुंडलीत दुसऱ्या घरात हा महालक्ष्मी राजयोग तयार झाला आहे. कुंडलीतील दुसरं घर हे धन आणि कुटुंबाशी संबंधित आहे. या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. कुटुंबात आनंदाची बातमी मिळणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. बँक बलेन्स वाढणार आहे. 


सिंह (Leo)


सिंह राशीच्या कुंडलीतील पहिल्या घरात महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. हे घरं उत्पन्न आणि लाभाशी संबंधित आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना भरभरुन आर्थिक फायदा होणार आहे. अनेक कामातून तुम्हाला फायदा होईल. लॉटरी किंवा शेअर मार्केट गुंतवणुकीतून धनलाभाचे योग आहेत. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )