Mahalaxmi RajYog Effects zodiac signs in marathi : अवकाशात सर्व 9 ग्रह वेळोवेळी आपली राशी बदल असतात. अशावेळी अनेक योग तयार होतात. काही योग तर तुम्हाला राजा बनण्याचं सुख देतात. हे अद्भूत आणि दुर्मिळ योग तुमचं नशीब एका रात्रीत बदलतात, असं ज्योतिष शास्त्र अभ्यास सांगतात. त्यांचानुसार लवकरच महालक्ष्मी राजयोग बनणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. त्यांना अचानक धनलाभ होणार आहे. (Mahalaxmi rajyog guru shukra making mahalaxmi rajyog in kundli this zodiac signs get lot of money astrology news in marathi )


कधी आहे महालक्ष्मी योग? (Shukra gochar 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की हा महालक्ष्मी राजयोग कधी असणार आहे. तर ज्योतिष शास्त्र अभ्यासकानुसार हा शुभ योग येत्या बुधवारी म्हणजे 6 एप्रिलला असणार आहे. 6 एप्रिलपासून गुरू आणि शुक्राची स्थिती महालक्ष्मी योग तयार करत आहे, ज्यामुळे 4 राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशीचे भाग्य उजळणार आहे. 



वृषभ (Taurus)


महालक्ष्मी योग तयार झाल्यानंतर या राशीच्या लोकांना तो भाग्यशाली ठरणार आहे. या लक्ष्मी योगाबरोबर शश आणि मालव्यही योग तयार होत आहे ज्यामुळे या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. या काळात तुम्हाला जोडीदाराची साथ मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. 



कन्या (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठीही हा महालक्ष्मी योग खूप फलदायी ठरणार आहे. अचानक धनलाभ होणार असल्याचं ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आलं आहे. तुम्हाला या योगामुळे नशिबाची साथ मिळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी प्रगतीची ठरणार आहे. 



मकर (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी योग खूप जास्त शुभदायक ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. अचानक तुम्हाला धनलाभ होणार आहे. व्यावसायिकांसाठी हा सर्वात फायदेशी काळ ठरणार आहे. त्यांना मोठी ऑर्डर मिळणार असल्याचे भाकीत ज्योतिष शास्त्र अभ्यासकाने केला आहे. अविवाहित लोकांचे लग्न ठरणार आहे. 


कुंभ (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी योग अत्यंत लाभदायक असणार आहे. या राशीच्या लोकांच्या कुंडलीत मालव्य आणि त्रिकोण राज योगही तयार होत आहे. त्यामुळे या काळ या राशीच्या लोकांसाठी सर्वाधिक शुभ ठरणार आहे. त्यांची आर्थिक स्थिती जबरदस्त मजबूत होणार आहे. जर उच्च शिक्षणाची इच्छा असेल तर ते स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे. 



(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)