Mahalaya Amavasya 2022 : सर्वपित्री अमावस्येला या चुका करु नका, नाहीतर...
Sarva Pitri Aamavasya 2022 : यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू झाला. तर 25 सप्टेंबरला संपणार आहे.
Sarva Pitru Amavasya 2022 Shradh Pind daan Tarpan : हिंदू पंचागानुसार (Hindu Panchang) पितृपक्ष अश्विन महिन्याच्या सर्व पितृ अमावस्येला समाप्त होतं. याला महालय अमावस्या आणि पितृ मोक्ष अमावस्या (Mahalaya Amavasya 2022) असंही म्हणतात. यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू झाला. तर 25 सप्टेंबरला संपणार आहे. या दिवशी पूर्वज परततात. त्यामुळे पितृ पक्षातील या शेवटच्या दिवसाला खूप महत्त्व आहे. ज्यांनी आजवर आपल्या पित्रांचे श्राद्ध केलेले नाही, त्यांनी ते सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करावं. पिंड दान करण्याची ही शेवटची संधी आहे. यासोबतच या दिवशी काही चुका करणे टाळा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकतं. (mahalaya amavasya 2022 dont make these mistakes on day sarva pitru amavasya)
सर्वपित्री अमावस्येला या चुका टाळा
सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ज्या पित्रांची मृत्यू तारीख माहित नाही किंवा ज्यांचा मृत्यू अमावस्येच्या दिवशी झाला असेल, अशाच पित्रांचे श्राद्ध करावं. अन्यथा मृत्यूच्या दिवशीच श्राद्ध करणे योग्य ठरतं.
पितृ पक्षात केस आणि नखे कापू नयेत. पण अमावास्येच्या दिवशी ही चूक अजिबात करू नका. अन्यथा भयंकर परिणामांना सामोरं जावं लागेल. अमावस्या संपल्यानंतरच नखे आणि केस कापा.
अमावस्येच्या दिवशी मांसाहार टाळा. तसं न केल्यास पित्र रागावू शकतात.
अमावस्येला गरिबाला प्राण्यांना रिकाम्या पोटी पाठवू नका. दारात आलेल्या भिक्षुकाला तुमच्या क्षमतेनुसार दक्षिणा द्या. मैदा, तांदूळ किंवा तीळ देणं उत्तम.
कोणत्याही गरिबाचा अपमान करू नका. कोणत्याही निष्पाप प्राण्याला त्रास देऊ नका. त्यापेक्षा लोकांना मदत करा. नाहीतर पित्र रागावू शकतात.
अमावस्येच्या दिवशी लसूण, कांदा, मसूर, जवस आणि धतुऱ्याचं सेवन करु नका. या दिवशी फक्त सात्विक अन्न खावे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)