मुंबई : आज १ मार्च २०२२, मंगळवारी संपूर्ण देशात शिवभक्त महाशिवरात्री आनंदाने साजरी करत आहेत. ब्रम्ह मुहूर्तावर रूद्राभिषेक, पूजा- पाठ सुरू झालं आहे. महाशिवरात्रीला भगवान शिवचे प्रकट दिन म्हणून ओळखले जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला झाला होता. 


हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, या दिवशी प्रथमच भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांनी शिवलिंगाची पूजा केली. तेव्हापासून महाशिवरात्रीला भोलेनाथाची पूजा, अभिषेक करण्याची परंपरा सुरू आहे. याच दिवशी शिव-पार्वती विवाह झाल्याचीही मान्यता आहे.


महाशिवरात्रीला ६ शुभ योग 


यंदाची महाशिवरात्री ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातूनही खूप महत्त्वाची आहे कारण आज या विशेष प्रसंगी ६ अतिशय शुभ योग तयार होत आहेत.


महाशिवरात्रीला शिवयोगाशिवाय शंख, पर्वत, हर्ष, दीर्घायुष्य आणि भाग्य नावाचे राजयोगही तयार होत आहेत. याशिवाय मकर राशीत शनीच्या राशीत पंचग्रही योगही तयार होतो.


यावेळी मकर राशीमध्ये शनि, मंगळ, बुध, शुक्र आणि चंद्र एकत्र राहतील. ज्योतिष शास्त्रानुसार पंचग्रही योगामध्ये भगवान शंकराची उपासना केल्याने अनेक पटींनी अधिक फळ मिळते.


एकंदरीत आज अनेक बाबतीत अतिशय विशेष ग्रहयोग राहतील.


महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त 


महाशिवरात्री 2022 रोजी पूजेसाठी अतिशय शुभ वेळ सकाळी 11:47 ते दुपारी 12:34 पर्यंत असेल. हा अभिजित मुहूर्त आहे. यानंतर दुपारी 02:07 ते 02:53 पर्यंत विजय मुहूर्त आहे.


यानंतर संध्याकाळी 05:48 ते 06:12 पर्यंत संध्याकाळचा मुहूर्त असेल.