Mahashivratri Upay 2023: माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री (Mahashivaratri 2023) हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीला शिवशंकराला (Lord Shiva) प्रसन्न करायचं असेल तर शिवपुराणात काही खास उपाय (Mahashivratri Upay) सांगितले आहेत. हे उपाय केल्याने भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही देखील तुमच्या राशीनुसार भगवान उपाय केले तर तुम्हाला खूप फायदे होतील. जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणते उपाय करावेत. (mahashivratri 2023 do shivji ke upay as per your zodiac signs know details in marathi)


महाशिवरात्रीला 2023: 12 राशींचे 12 उपाय पूर्ण करतील तुमच्या सर्व इच्छा जाणून घ्या...


  • मेष 


        महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात दूध आणि मध मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा. साखर किंवा गुळाची गोड पुरी करून शिवाला अर्पण करू शकता.


  • वृषभ


       अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करायचा असेल तर शंकराला दही आणि उसाच्या रसाने अभिषेक करावा, असं सांगितलं जातं. यासोबतच शिवाच्या वाहन नंदीला म्हणजेच बैलाला चारा देऊ शकता. सात्विक जीवनात चांगले दिवस येतात.


  • मिथून


       तुम्हाला जर समृद्धी आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर तुम्ही शिवलिंगावर दूध, तूप किंवा मधाचा अभिषेक करू शकता. वैवाहिक आयुष्यात फायदा होतो.


  • कर्क


      धन, धान्य आणि लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर चंदन आणि तांदूळ अर्पण करू शकता. तसेच शिवलिंगावर शुद्ध तुपाचा अभिषेक करावा, त्याचा फायदा होतो, असं म्हणतात. 


  • सिंह


       शिवरात्रीच्या संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावू शकता. व्यवसाय आणि नोकरीत लवकरच फायदा होतो, असं म्हणतात.


  • कन्या


       शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा, त्यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होते, असं मानलं जातं. यासोबतच शिवलिंगावर बेलपत्र आणि धतुरा अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतील, अशी मान्यता आहे.


  • तुळ


       तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा. भगवान शंकराला भांग, धतुरा आणि बर्फी अर्पण करा.


  • वृश्र्चिक


      शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा. भगवान शिवाला 108 बेलपत्र आणि बेर अर्पण करावं. या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच पैसे तुमच्याकडे चालून येतील.


  • धनु


      दुधात केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा, लग्न झालेल्या महिला हा उपाय करू शकतात. त्याचबरोबर भगवान शंकराची बेलपत्र आणि दाटीच्या फुलांनी पूजा करावी, त्याने वैवाहिक सुख मिळेल.


  • मकर


      तुम्हाला जर सुख आणि समृद्धी पाहिजे असेल तर काळे तीळ दुधात मिसळून अभिषेक करा. भगवान शंकराला भांग आणि धतुरा अर्पण केल्याने इच्छित यश मिळेल, असं म्हटलं जातं.


आणखी वाचा - Mahashivratri Upay: शनिदेव तुम्हाला त्रास देत असतील तर महाशिवरात्रीला करा 'हा' उपाय, साडेसातीपासून मिळेल मुक्ती!


  • कुंभ 


    दुधात केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा. शमीच्या फुलाने शिवाची पूजा केल्याने शनिदेवाच्या दुःखापासून आराम मिळतो, असं म्हणतात. त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात त्याचा चांगला परिणाम होतो.


  • मीन


    मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर नारळ पाण्याने अभिषेक करावा. शिवलिंगावर तांदूळ आणि चंदन अर्पण करा. खासगी आयुष्यात त्याचे चांगले परिणाम पहायला मिळतील.


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)