Mahashivratri 2023  : या वर्षी महाशिवरात्री कधी आहे याबद्दल अनेकांना शंका आहे. यावर्षी 18 फेब्रुवारी 2023 म्हणजे शनिवारी महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. शंकरदेवाला प्रसन्न करण्यासाठी निर्जला व्रत करतात. शंकराची पूजाअर्चा करतात पण त्या दिवशी चुकून अशी कामं करु नका अन्यथा भगवान शिव नाराज होतील. (mahashivratri 2023 know dos and donts mistakes at Pooja and fasting financial loss Astrology Tips in marathi news)


'या' गोष्टींची काळजी घ्या अन्यथा..!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नये. कारण काळे कपडे घालणे अशुभ मानले जाते. 


2. शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद भक्तांनी स्विकारू नये. कारण हे अशुभ मानलं जातं. कारण असं केल्यास तुम्हाला धनहानी आणि आजारपण येऊ शकतं. 


3. शिवलिंगावर कधीही तुळशी अर्पण करू नका .


4. शिवलिंगावर अर्पण करणारं दुध कधीही पाश्चराइज्ड किंवा पॅकेटवालं वापरु नका. 


5. अभिषेक नेहमी सोन्या, चांदी किंवा पितळेच्या अशा पात्रानेच करावा. अभिषेकसाठी कधीही स्टील, प्लास्टिकची भांड्यांचा वापर करु नका. 


6. भगवान शिवाला विसरुनही केतकी आणि चंपा फुले अर्पण करू नका. असं म्हटलं जातं की या फुलांना भगवान शंकराने शाप दिला होता. केतकीचे फूल पांढरे असले तरी भोलेनाथच्या पूजेत अर्पण करुन नये. 


7. शिवरात्रीचा उपवास सकाळी सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत असतो. उपवासात फळे आणि दूध घ्यावे. मात्र, सूर्यास्तानंतर काहीही खाऊ नये. 


 


हेसुद्धा वाचा - Maha Shivratri 2023 : कधी आहे महाशिवरात्री? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि मंत्र


 


8. शिवाच्या पूजेत चुकूनही तुटलेला तांदूळ अर्पण करू नये. अक्षत म्हणजे अखंड तांदूळ, ते परिपूर्णतेचे प्रतीक आहे. 


9. सर्व प्रथम शिवलिंगावर पंचामृत अर्पण करावे. पंचामृत म्हणजे दूध, गंगेचे पाणी, केशर, मध आणि पाणी यांचं मिश्रण. चार प्रहारांची पूजा करणाऱ्यांनी पहिल्या प्रहाराचा अभिषेक पाण्याने, दुसरा प्रहार दह्याने, तिसरा प्रहार तूपाने आणि चौथा प्रहार मधाने करावा. 


10 . दूध, गुलाबजल, चंदन, दही, मध, तूप, साखर आणि पाणी वापरून शिवाला तिलक लावा. भोलेनाथांना अनेक फळे अर्पण करता येतात, पण शिवरात्रीला बोरीचा नैवेद्य दाखवावा. कारण बोर हे अनंतकाळचं प्रतीक मानलं जातं. 


11. शिवलिंग किंवा भगवान शंकराच्या मूर्तीवर फक्त पांढऱ्या रंगाची फुलेच अर्पण करावीत असं मानलं जातं. कारण भोलेनाथला फक्त पांढऱ्या रंगाची फुले आवडतात. शिवरात्रीला भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी चंदनाचा टिळा लावावा. शिवलिंगावर कधीही कुमकुम तिलक लावू नका. तथापि, भक्त माँ पार्वती आणि गणेशाच्या मूर्तीवर कुंकुम टिका लावू शकतात. 


12. या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. लवकर उठा आणि आंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नका. उपवास नसला तरी आंघोळ केल्याशिवाय अन्न घेऊ नये.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)