MahaShivratri 2023 : आज शिवभक्तासाठी सर्वात मोठा सण आहे. आज महाशिवरात्री...म्हणजे महादेव शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. असं मानलं जातं की शिवरात्रीला भोलेनाथाचा जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केल्याने धनसंपत्तीचा लाभ होतो. या दिवशी केवळ शिवाची स्तुती केल्याने अकाली मृत्यूचं भय नाहीसं होतं. या वर्षी महाशिवरात्रीला त्रिग्रही योग तयार होत असून, या दिवशी सूर्य, शनि आणि चंद्र कुंभ राशीत बसतील. ग्रहांच्या या स्थितीमुळे अनेक राशींना पैसा, नोकरी, व्यवसायात बंपर लाभ मिळतील. जाणून घेऊया महाशिवरात्रीला कोणत्या राशींचे भाग्य खुलणार आहे. (MahaShivratri 2023 these lucky zodiac sign Taurus Cancer Aries Aquarius incomplete work is completed and lot of money in marathi)


कुंभ (Aquarius)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.  या दिवशी पिता-पुत्र म्हणजेच सूर्य आणि शनि कुंभ राशीत एकत्र असतील, तर चंद्रही उपस्थित असेल. अशा प्रकारे महाशिवरात्रीचा सण तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे, कामे पूर्ण होतील. भोलेनाथसह शनिदेवाच्या कृपेने करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात वाढ होईल.


मेष (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीचा दिवस शुभ राहील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन संधी मिळतील. भगवान शिवाच्या कृपेने त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. बरेच दिवस रखडलेली कामं पूर्ण होतील. 


कर्क (Cancer)


भगवान शिवाला कर्क राशीचे देवता मानलं जातं. महाशिवरात्रीला कर्क राशीच्या लोकांवर भोलेनाथ कृपा करतील. पैशाच्या बाबतीत मोठा फायदा होईल. विविध ठिकाणांहून पैसे मिळतील. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. उच्च अधिकार्‍यांशी संबंध चांगले राहतील.


वृषभ (Taurus)


वृषभ भोलेनाथांच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. यंदाचा शिवरात्रीचा दिवस त्यांच्यासाठी खूप खास असणार आहे. ज्या लोकांच्या नोकरीत प्रगतीमध्ये अडथळे आले, त्यांना चांगली बातमी मिळेल. पगारात बंपर वाढ होऊ शकते. नवीन वाहन खरेदीसाठी शुभ काळ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.