Lucky Zodiac Sign on Mahashivratri : हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक सणाचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे. त्यातही काही दिवसांना अतीप्रचंड महत्त्व प्राप्त आहे. आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा हे दिवस अतीव महत्त्वाचे आहेत. यातलाच एक दिवस म्हणजे, महाशिवरात्र. शंकर आणि पार्वतीची या दिवशी यथासांग पूजाअर्चा केली जाते. यंदाची महाशिवरात्र 19 फेब्रुवारीला असेल. या दिवशी असे काही खास योग तयार झाले आहेत ज्यांचा थेट फायदा 6 राशींना होणार आहे. चला तर मग पाहुया यात तुमची रास आहे का...(Mahashivratri 2023 will be beneficial to 6 zodiac sign people read details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुंभ - महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. ज्यामुळं कुंभ राशीचं नशीब फळफळणार आहे. यादरम्यान, या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. अचानकच आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळं तुमची अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. 


तुळ - तुळ राशीराशी या दिवसापासून चांगला काळ सुरु होणार आहे. या राशीमध्ये चतुर्थ भाव तयार होत आहे. ज्यामुळं भौतिक सुख मिळणार आहे. तुम्हाला मिळणाऱ्या आशीर्वादांमध्येही वाढ होणार आहे. बँकेच्या खात्यात लक्ष्मीचा वास राहणार आहे. ज्यामुळं अनेक कामं मार्गी लावण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. (Mahashivratri mahurat)


धनु- धनु राशीच्या जातकांवर महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष कृपा असणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासोबतच या दिवशी अनेकांच्या आयुष्यात सुखाची उधळण होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रचंड यश मिळणार आहे. पदोन्नतीचा योग आहे. 


हेसुद्धा वाचा : Lucky Zodiac Sign : फेब्रुवारीत 'या' 4 भाग्यशाली राशींच्या लोकांचं नशीब चमकणार, होणार आर्थिक प्रगती


 


मिथुन- मिथुन राशीच्या व्यक्तींचं नशीब महाशिवरात्रीपासून फळफळणार आहे. शंकराच्या कृपेनं या मंडळींच्या वाटेतील अडसर दूर होणार आहेत. नोकरदार वर्गाला यश मिळण्यासोबतच वेतनवाढ मिळणार आहे. नव्या नोकरीच्या संधी तुमच्याकडे चालून येणार आहेत. 


वृषभ- ज्योतिषविद्येत दिलेल्या माहितीनुसार यंदा वृषभ राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये प्रगती करण्याची संधी मिळणार आहे. त्यांची अडकलेली सर्व कामं मार्गी लागणार आहेत. कुटुंबात सुख नांदणार आहे. एखादी गोड बातमी तुमचं आयुष्य बदलणारी ठरेल. एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात? तर हीच योग्य वेळ आहे. 


(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)