Mahashivratri 2024 : यंदा महाशिवरात्री अतिशय खास असणार आहे. देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाट्यात साजरा करण्यात येतो. यंदाची महाशिवरात्री अतिशय खास आहे. पंचांगानुसार या दिवशी शुभ योग जुळून येणार आहे. महाशिवरात्री 8 मार्च म्हणजे महिला दिनी (International Women's Day 2024) असणार आहे. महाशिवरात्रीला भोलेनाथाची धतुरा, भांग, फुलं, बेलपत्र अर्पण पूजा करण्यात येते. यादिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि सिद्ध योग आहे. शिवाय श्रवण नक्षत्र आणि शिव योगासह मकर राशीत चंद्र असणार आहे. हा दुर्मिळ योग काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. कोणत्या राशींवर भोलेनाथाची कृपा बसरणार आहे, जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप चांगला सिद्ध होणार आहे. या काळात तुमचं कोणावर प्रेम असेल तर ते कबुल करण्यासाठी शुभ असणार आहे. कारण ज्योतिष शास्त्रानुसार हा काळ खूप चांगला असणार आहे. घरामध्ये शुभ कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे. ज्यामुळे मन प्रसन्न होणार आहे. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. तुम्हाला माता पार्वतीचा आशीर्वाद मिळणार आहे. 


उपाय : या दिवशी देवाची पूजा करताना लाल कणेरचे फूल अर्पण करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही शिवाष्टकांचे पठण करा. 


मिथुन रास (Gemini Zodiac)


मिथुन राशीच्या लोकांसाठीही शिवरात्रीचा सण नवीन आनंद घेवून येणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा असणार आहे. याशिवाय नवीन पाहुण्याच्या आगमनाची चांगली बातमी कानावर पडणार आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून लग्न करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य असणार आहे.  


उपाय : या दिवशी तुम्ही देवाला शिवलिंगावर पांढऱ्या फुलांच्या आकृती अर्पण करा. ज्यामुळे देवाला विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल.


तूळ रास (Libra Zodiac)  


तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप भाग्यवान असणार आहे. या काळात प्रेमसंबंधांमध्ये गोडवा असणार आहे. तुम्ही तुमच्या पालकांशी तुमच्या नात्याबद्दल बोलण्यासाठी योग्य वेळ असणार आहे. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा कार्यक्रम तुम्ही ठरवणार आहे. या काळात कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतित करणार आहात. 


उपाय : या दिवशी तुम्ही शिवलिंगावर 7 सुवासिक पांढरी फुलं  अर्पण करा. तसंच लाभासाठी शिव चालिसाचा पाठ करा.


कुंभ रास  (Aquarius Zodiac) 


कुंभ राशीच्या लोकांवर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या आशीर्वादांचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे. या काळात तुमची सर्व वाईट कामं थांबणार आहेत. तुमचं धार्मिक कार्यात मन रमणार आहे. परदेश प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पैशाच्या आगमनाने आर्थिक स्थिती सुधाणार आहे. ज्यामुळे मानसिक तणाव दूर होणार आहे. 


उपाय : जीवनात सुख, आनंद आणि समृद्धीसाठी शिवलिंगावर भस्माचा त्रिपुंड लावा. याशिवाय अपराजिता फुल अर्पण करा.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)