Mahashivratri 2024 Date : महाशिवरात्री देशभरात अतिशय थाट्यामाट्यात साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री अतिशय खास आहे. या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दुहेरी योग जुळून आला आहे. महाशिवारात्रीशिवाय त्यादिवशी प्रदोष व्रताचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्याशिवाय यंदा महाशिवारात्रीला तब्बल 300 वर्षांनंतर अनेक अद्भूत योग जुळून आले आहेत. यंदा 4 शुभ संयोग जुळून आला असून या योगात भगवान भोलेनाथाची पूजा करणे शुभ मानले जाते.असा हा भोलेनाथाचा सण नेमका कधी आहे जाणून घेऊयात. (mahashivratri 2024 date time shubh muhurat puja vidhi signification mahashivratri astrology remedy in marathi) 


महाशिवरात्री 2024 कधी आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येतो. यंदा फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी ही 8 मार्चला रात्री 09.57 वाजता सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी 9 मार्चला संध्याकाळी 06.17 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार महाशिवरात्री 8 मार्च 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. 


महाशिवरात्री 2024 पूजेसाठी शुभ मुहूर्त कोण?


महाशिवरात्रीच्या निशिता पूजेची वेळ - रात्री उशिरा 12.07 ते 12.56 मिनिटांपर्यंत.


निशिता काल पूजेची वेळ : 9 मार्चला दुपारी 12.13 ते 01.01 मिनिटांपर्यंत


रात्री प्रथम प्रहर पूजा वेळ : संध्याकाळी 6.29 ते रात्री 9.33 मिनिटांपर्यंत.


रात्रीची दुसरी प्रहर पूजा वेळ: 8 मार्चला सकाळी 9.33 मिनिटे ते 9 मार्च रोजी 12.37 मिनिटांपर्यंत.


रात्री तृतीया प्रहर पूजा वेळ: 9 मार्चला सकाळी 12.37 ते पहाटे 3.40 मिनिटांपर्यंत.


रात्री चतुर्थ प्रहर पूजा वेळ : 9 मार्चला सकाळी 3.40 ते सकाळी 6.44 मिनिटांपर्यंत.


हेसुद्धा वाचा - Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला 4 शुभ संयोग! 'या' राशीच्या लोकांवर बरसणार भगवान भोलेनाथाची कृपा


महाशिवरात्री 2024 रोजी 4 शुभ योगायोग


1. सर्वार्थ सिद्धी योग - सकाळी 06:38 ते सकाळी 10:41 वाजेपर्यंत 
2. शिवयोग - सूर्योदय 09 मार्चला दुपारी 12:46 वाजेपर्यंत 
3. सिद्ध योग - 09 मार्चला सकाळी 12:46 ते रात्री 08:32 वाजेपर्यंत
4. श्रावण नक्षत्र - पहाटेपासून सकाळी 10:41 पर्यंत आणि त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र


महाशिवरात्री पूजा विधी 


महाशिवरात्रीला सकाळी स्नान करुन नवीन कपडे परिधान करा. नंतर पूजेचे ताटात दूध, बेलपत्र, धतुरा, पाणी, रुद्राक्षा, अक्षत आणि फुलं ठेवा. पाण्याचे भांडे आणि पूजेचे ताट शुद्ध लाल कपड्याने झाकून ठेवा. आता शिवलिंगाची पूजा करून भगवान शंकराचे ध्यान नक्की करा. दक्षिण दिशेला बसून शिवलिंगाची पूजा करा.  सगळ्यात आधी भगवान शंकराला दूध अर्पण करा. त्यानंतर शिवलिंगाला जल अर्पण करा.आता शिवलिंगासमोर अक्षत आणि रुद्राक्ष अर्पण करा. यानंतर शिवलिंगाला त्रिपुंड टिळक लावा. त्रिपुंड टिळक लावल्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र आणि धतुरा अर्पण करा. यानंतर शिवलिंगाला फुलं अर्पण करा आणि भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करा. भगवान शिवाच्या मंत्रांचा जप केल्यानंतर शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घाला. भगवान शंकराची आरती करा. काही जण घरात शिवलिंगाचा अभिषेकही करत असतात. यानंतर सर्वांमध्ये प्रसादाचं वाटप करा.


महाशिवरात्रीचे पूजा नियम


शिवलिंगाची पूजा पूर्व, उत्तर आणि पश्चिम दिशेला करणे अशुभ मानले जाते.  
भगवान शिवाच्या मूर्तीची पूर्ण प्रदक्षिणा आणि शिवलिंगाची अर्धी प्रदक्षिणा नक्की करा. 
भगवान शिवाची पूजा करण्यापूर्वी माता पार्वतीची पूजा नक्की करा.
माता पार्वतीच्या पूजेशिवाय भगवान शिवाची पूजा संपन्न होत नाही. 
 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)