Makar Sankranti 2023: 15 जानेवारी 2023 ला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. या स्थितीला पंचांगानुसार मकर संक्रांती असं संबोधलं जातं. 14 जानेवारी 2023 रोजी रात्री 8 वाजून 21 मिनिटांनी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील. पण उदय तिथीनुसार मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाईल. संक्रांतीचा शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी सुरु होईल. हा मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 41 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी दान किंवा धार्मिक विधीचे दुप्पटीने फळ मिळतं, असं शास्त्रात सांगितलं आहे. मकर संक्रांतीला तिळापासून बनवलेले पदार्थ दान करण्याची प्रथा आहे. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर लग्न, गृहप्रवेश, घरबांधणी, घर खरेदी आणि मुंडण या ही शुभ कार्य केली जातात. या व्यतिरिक्त काही बाबी या दिवशी करण्यास मनाई आहे.


मकर संक्रांतीला या बाबी करा


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    पवित्र नदीत स्नान- मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने पापातून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. तसेच मोक्षप्राप्ती मिळत असल्याचं शास्त्रात सांगितलं आहे. गंगा नदीच स्नान करणं उत्तम मानलं जातं. गंगा नदीत स्नान शक्य नसल्यास घरीच पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावं. 

  • सूर्यदेवांना अर्घ्य- मकर संक्रांतील सूर्यदेव दक्षिणायनकडून उत्तरायणाकडे चाल करतात. यामुळे पूजा पठणाचं महत्त्व वाढतं. पूजाविधीनंतर अर्घ्य देणाऱ्या पाण्यात कुंकू आमि काळे तीळ टाकून अर्घ्य द्यावं. यामुळे सूर्यदेवाची कृपा प्राप्त होईल. 

  • दान- या दिवशी दान केल्याने दुपट्टीने फळ मिळतं. या दिवशी केलेलं दान भगवंताकडे पोहोचते अशी समज आहे. उडद, ब्लँकेट, गूळ आणि शुद्ध तुपाचे दान या दिवसी करावे. यामुळे शनि राहुच्या दोषापासून मुक्ती मिळते. 


बातमी वाचा- Makar Sankanti 2023: मकर संक्रांतीला या वस्तूंचं दान करा आणि शनि-राहुच्या दोषापासून मुक्ती मिळवा


मकर संक्रांतीला या बाबी करू नका


  • तामसिक भोजन- मकर संक्रांतीच्या दिवशी सिगारेट, दारू, गुटखा आदी मादक पदार्थांचं सेवन करू नये. तसेच मसालेदार जेवण या दिवशी वर्ज्य आह. या दिवशी तीळ आणि मूग डाळ खिचडीचं सेवन करा. 

  • अपमान करू नका- या दिवशी घरी भिकारी, साधू, म्हातारी व्यक्ती आली तर तिला दुखवू नका. तसेच त्यांना घरातून रिकामी हाती पाठवू नका. आपल्या सामर्थ्यानुसार काही तरी दान नक्की द्या. 

  • स्नानापूर्वी खाऊ नका- मकर संक्रांतीला गंगा किंवा अन्य पवित्र नदीत स्नान करण्यापूर्वी काही खाऊ नका. घरच्या पाण्यात पवित्र नदीचं पाणी टाकल्यानंतरही हाच नियम लागू असेल. स्नानानंतर दान करा आणि नंतर खा.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)