Makar Sankanti 2023: मकर संक्रांतीला या वस्तूंचं दान करा आणि शनि-राहुच्या दोषापासून मुक्ती मिळवा

Makar Sankranti 2023: इंग्रजी कॅलेंडरनुसार नववर्षाला सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्यात पहिला सण म्हणून मकर संक्रांती येणार आहे. धार्मिकदृष्ट्या हा सण महत्त्वाचा आहे. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच या दिवशी खरमास देखील संपत आहे.

Updated: Jan 1, 2023, 01:41 PM IST
Makar Sankanti 2023: मकर संक्रांतीला या वस्तूंचं दान करा आणि शनि-राहुच्या दोषापासून मुक्ती मिळवा title=

Makar Sankranti 2023: इंग्रजी कॅलेंडरनुसार नववर्षाला सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्यात पहिला सण म्हणून मकर संक्रांती येणार आहे. धार्मिकदृष्ट्या हा सण महत्त्वाचा आहे. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच या दिवशी खरमास देखील संपत आहे. हिंदू पंचांगानुसार सूर्यदेव 14 जानेवारी रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे उदय तिथीनुसार मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाईल. संक्रांतीचा शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी सुरु होईल. हा मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 41 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी दानाचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्यास त्याचं फळ दुपटीनं मिळतं. तसेच शनि राहुच्या दोषापासून मुक्ती मिळते. 

उडद- उडद डाळ ही शनिदेवाशी संबंधित आहे. अशात मकर संक्रांतील उडद डाळीच्या खिचडीचं दान केल्यास लाभ मिळतो. कुंडलीत शनिची स्थिती खराब असल्यास दोष दूर होतो. दुसरीकडे मकर संक्रांतीला तिळाचं दान केल्यास शनिची दोष कमी होतो, असं सांगितलं जातं. 

ब्लँकेट- मकर संक्रांतीला गरीबांना ब्लँकेट दान केल्यास त्याचा लाब मिळतो. या दिवशी गरीब आणि गरजूंना ब्लँकेट दान केल्यास राहुचा दोष कमी होतो. तसेच दानाचं फळ दुपटीनं मिळत असल्याने फायदा होतो. 

गुळाचे दान - ज्योतिष शास्त्रानुसार गुळाचा संबंध देवगुरु बृहस्पति आणि सूर्य देवाशी संबंधित आहे. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. त्यामुळे या दिवशी गूळ दान केल्याने सूर्यदेव आरोग्यदायी वरदान देतात. यासोबतच या दिवशी तांब्याच्या भांड्यात गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

बातमी वाचा- Shani Gochar 2023: 17 दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, नववर्षात या राशींना मिळणार साथ

शुद्ध तुपाचे दान - मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तुपाचे दान केल्यास नोकरी आणि व्यवसायात यश मिळते. या दिवशी शुद्ध तुपाचे दिवे लावून सूर्याची पूजा करावी.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)