Makar Sankranti 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाला आपलं असं वैशिष्ट्य असतं. नवीन वर्षात जानेवारी महिन्यातील पहिला सण असतो तो मकर संक्रांत. प्रत्येक महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य देव जेव्हा एका राशीतून  दुसऱ्या राशीत जातो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं. यानुसार वर्षात सूर्य संक्रांत ही 12 वेळा असते. पण जेव्हा जानेवारी महिन्यात सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती म्हटलं जातं. या वर्षी कधी आहे, त्याचं महत्त्व काय आणि यंदा मकर संक्रांतीचं वाहन कुठलं याबद्दल जाणून घेणार आहोत. (makar sankranti 2024 date pooja vidhi muhurt and makarsankranti vehicle powerful yoga significance and importance)


संक्रातीच्या आदल्या दिवशी असतो भोगीचा उत्साह!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मानुसार सूर्य संक्रांतीपासून थंडीला सुरुवात होते. आणि संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं. हिवाळ्यात जास्त जास्त ताज्या भाज्या बाजारात येतात. या भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात सर्व  भाज्या एकत्र करुन त्यासोबत बाजरीच्या भाकरीला तीळ लावून खाण्याची परंपरा आहे. 


मकर संक्रांती तिथी आणि मुहूर्त  (Makar Sankranti 2023 Date)


गेल्या दोन वर्षांनुसार यंदाही मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. मिथिला पंचांगानुसार, सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी, तर काशी पंचांगानुसार, सकाळी 8 वाजून 42 मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीत गोचर करणार आहे. यामुळे 15 जानेवारीच्या दिवशीच मकर संक्रांती साजरा करण्यात येणार आहे. 


मकर संक्रांती शुभ योग (Makar Sankranti 2023 Shubh Muhurat )


हिंदू पंचांगानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री 11:11 पर्यंत वरियान योग असणार आहे. याशिवाय या दिवशी रवि योग असून सकाळी 7:15 ते 8:07 पर्यंत तो असणार आहे. या योगांमध्ये पूजा आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते, असं ज्योतिषशास्त्र पंडित सांगतात. 


हेसुद्धा वाचा - मकर संक्रांतीशिवाय 'या' दिवशी घरात करु नये चपाती! संकटाने घेरलं जाईल आयुष्य


यंदा मकर संक्रांतीचं वाहन दमदार!


प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच वाहन वेगवेगळं असतं. या वर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येणार आहे. याचा अर्थ मकर संक्रातीचं वाहन घोडा आणि उपवाहन सिंहीण असणार आहे. 


मकर संक्रांतीची पूजा पद्धत


15 जानेवारीला संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं शुभ मानलं जातं. तुमच्या शहरात नदी नसल्यास घरात पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करु सूर्यदेवाची पूजा करावी. सूर्यदेवाला जल अर्पण करावे. शिवाय वाहत्या प्रवाहात तीळ अर्पण करणे शुभ मानलं जातं. यादिवशा सूर्य चालिसाचे पठण करावं. शिवाय या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होतं. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)