मकर संक्रांतीशिवाय 'या' दिवशी घरात करु नये चपाती! संकटाने घेरलं जाईल आयुष्य

Do Not Make Roti On These Days : हिंदू धर्मात आणि धर्म पुराणानुसार सुखी जीवनासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. स्वयंपाक घरातही वर्षातील काही असं दिवस असतात त्या दिवशी चपाती किंवा पोळी बनवण्यास अशुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार काही सणांच्या दिवशी गॅसवर तवा ठेवणं किंवा तवा गरम करणं अशुभ मानलं गेलं आहे.   

Jan 07, 2024, 17:59 PM IST
1/7

धर्म पुराणानुसार एकादशीला भात शिजवल्या जात नाही. तसाच काही सणाच्या दिवशी चपाती किंवा पोळी बनवणं वर्ज्य मानलं जातं. 

2/7

मकर संक्रांती 2024

त्यातील पहिला सण आहे मकर संक्रांत. यंदा 15 जानेवारीला साजरा करण्यात येणाऱ्या या सणाच्या दिवशी चपाती किंवा पोळी करणे अशुभ मानलं जातं. यादिवशी बाजरीच्या भाकरीवर तिळ लावून खाल्लं जातं. 

3/7

शीतला अष्टमी 2024

या वर्षी शीतला अष्टमी 2 एप्रिलला साजरी करण्यात येणार असून यादिवशी गॅस लावणे चुकीचं मानलं जातं. या दिवशी देवीला शिळ अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो. 

4/7

नाग पंचमी 2023

या वर्षी  नागपंचमी 9 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी तवा गरम करणे, काही कापने अशुभ मानलं जातं. या दिवशी हलवापुरी खाण्याची परंपरा आहे. 

5/7

शरद पौर्णिमा 2024

शरद पौर्णिमेच्या दिवशीही घरी चपाती करण्यावर बंदी असते. या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांमध्ये निपुण असल्यामुळे संध्याकाळी खीर तयार करून चंद्रप्रकाशात ठेवून तो प्रसाद म्हणून ग्रहण करण्यात येतो. यंदा 16 ऑक्टोबरला शरद पौर्णिमा आहे. 

6/7

माता लक्ष्मीचे सण

लक्ष्मीशी संबंधित कोणत्याही सणाच्या दिवशी घरी चपाती किंव पोळी करत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार देवी माता लक्ष्मी नाराज होते. तिला पुरीचा नैवेद्य आवडतो. 

7/7

घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास

घरात कोणाचा मृत्यू झाल्यास घरात चपाती किंवा पोळी करत नाही. हिंदू धर्मात तेराव्या विधीसाठी कायदा सांगण्यात आला आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)