Makar Sankranti  2024 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगाचा सण (Bhogi) साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. यादिवशी मिश्र भाज्यांची भाजी जिला भोगी म्हणतात ती केली जाते. त्यासोबत तिळ लावलेली बाजारीची भाकरी केली जाते. मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करणे. बोचरी थंडी आणि त्यापासून आपल्या संरक्षणासाठी हिंदू धर्मात या सण उत्सावाला महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला एक नियम सांगण्यात आला आहे. आंघोळीच्या पाण्यात तीळ घालण्यापासून केस धुण्यापर्यंत अनेक गोष्टींचं नियम आहेत. हे नियम आपण वर्षांवर्ष पाळत आलो आहोत, पण कधी असा प्रश्न पडलाय का, की भोगी नेमकी का साजरी केली जाते?  या नियमाचे काय अर्थ आहे. (Why wash your hair on Bhogi festival the day before Makar Sankranti 2024). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोगी नेमकी का साजरी केली जाते?


हिवाळ्या असल्याने बाजारात सगळ्या भाज्या आलेल्या असतात. अशावेळी थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं आणि रोगराई दूर राहावी म्हणून सर्व भाज्या खाणं आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. मग हिवाळ्यात ताज्या भाज्या एकत्र करुन ती बनवली जाते आणि खाल्ली जाते. त्या भाजीला भोगी असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात एक म्हण आहे, जो न खाई भोगी तो सदा रोगी...खरं तर हा सण म्हणजे नात्यांमधील ओलावा कायम राहावा आणि नाती आणखी दृढ व्हावी असा त्यामागील उपदेश आहे. 


हेसुद्धा वाचा - Makar Sankranti 2024 : 'जो न खाई भोगी तो...', आजीच्या गावरान पद्धतीने बनवा पौष्टिक-चमचमीत भोगीची भाजी, लक्षात ठेवा 3 गोष्टी!


पुराणकथा काय सांगते?


असं म्हणतात की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवलं जातं, त्यांना स्मरूनच पूजा करणं शुभ मानलं जातं. इंद्रानंच पृथ्वीवर अमाप पिक पिकावीत अशी प्रार्थना या दिवशी केली होती. हीच पिकं आजपर्यंत अनेकांचीच भूक भागवत आली, अनेकांना समृद्ध करत आली, अशी कथा आहे. हेच चक्र अविरतपणे चालत रहावं या हेतूनं भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.  या दिवशी केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट करण्यात येतो. तसंच विविध रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी प्रार्थनाही केली जाते, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. 


हेसुद्धा वाचा - Makar Sankranti 2024 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांत? जाणून मुहूर्त, सुगड पूजासह संपूर्ण माहिती


भोगी अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतींनी साजरी करण्यात येते. एकट्या महाराष्ट्रातच भोगीच्या दिवसाची अनेक रुपं तुम्हाला पाहिला मिळतील. कोकण, मराठवाडा, विदर्भ या सर्व भागांमध्ये भोगी मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या प्रकारे साजरी होते. अगदी भोगीची भाजी करण्याची पद्धतीही वेगवेगळी आहे.  


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)