Bhogi 2024 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला महाराष्ट्रात अतिशय महत्त्व आहे. या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं. यादिवशी एक विशिष्ट प्रकाराची भाजी केली जाते. या दिवशी असं म्हणतात जो न खाई भोगी तो सदा रोगी...याचा अर्थ ही भोगीची भाजी इतकी पौष्टिक आणि आरोग्यवर्धक असते, जी सर्वांनी खायलाच पाहिजे. अशी ही भाजी परंपर पद्धतीने असो किंवा लेकुरवाळी असो कशी करतात याची रेसिपी जाणून घेणार आहोत. (Makar Sankranti 2024 Jo Na Khai Bhogi To make bhogi in grandma Gavran style how to make bhogichi bhaji recipe remember 3 things Bhogi 2024 )
ही एक प्रकारची मिक्स भाजी असते. जी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात करण्याची परंपरा वेगळी आहे.
ओल्या तुरीच्या दाणे - ½ वाटी
ओल्या पावट्याचे दाणे - ½ वाटी
ओल्या हरभऱ्याचे दाणे - ½ वाटी
ओला ताजा मटार - ½ वाटी
कच्चे शेंगदाणे - मूठभर
गाजर - ¼ वाटी
घेवड्याच्या शेंगा - ½ वाटी
वांगी - 2 मध्यम
बटाटा - 1 मध्यम
काशीपुरी बोर - 7/8
उसाचे तुकडे - 5/6
लसणाच्या (Garlic) पाकळ्या - 12 /15
आलं / 1 इंच
हिरव्या मिरच्या - 2
सुकं खोबरं - 2/3 चमचे
पांढरे तीळ - 2 चमचे
खसखस- ½ चमचा
धणे - ½ चमचा
जिरे - ¼ चमचा
कोथिंबीर - मूठभर
कांदा (Onion) - 1 मधम
टोमॅटो - 1 मध्यम
तिखट - ½ चमचा
गरम मसाला पावडर - ¼ चमचा
हळद - ¼ चमचा
मीठ - चवीनुसार
तेल - आवश्यकतेनुसार
पाणी - गरजेपुरता
भोगीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम लसूण, हिरवी मिरची, सुके खोबरे, तीळ, खसखस, धणे, जिरे आणि कोथिंबीर घालून पेस्ट तयार करा.
कढईत तेल घेऊन वरील सर्व भाज्या घालून मीठ घाला. तेलावर चांगले परतवून घ्या.
ताटात परतवलेल्या भाज्या काढून थंड होऊ द्या. त्यानंतर कढईत तेल घेऊन राई, जिरे, कढीपत्ता, कांदा आणि तयार केलेली पेस्ट घालून चांगेल परतवून घ्या.
नंतर त्यात टोमॅटो आणि कोथिंबीर घालून परतवून घ्या. हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून चांगले परतवून घ्या.
मंदआचेवर झाकण ठेवून पेस्ट चांगल्याप्रकारे शिजू द्या. त्यात परतवलेल्या भाज्या घाला. चिमूटभर मीठ घालून मिश्रण परतवून घ्या.
त्यानंतर पाणी घालून भाजीला चांगील उकळ काढून घ्या. तयार आहे गावरान पद्धतीची भोगीची भाजी.
1. भोगीच्या भाजीला चवीसोबत त्यात तिळाला महत्त्व आहे. पण हे तीळ, ओलं, सुकं खोबरं, थोडे दाणे यांचं वाटण बनवून भाजी घ्यातल्यास चवी अधिक वाढते.
2. ही भाजी करताना आधीपासून भाज्या आणून तयारी करुन ठेवा. यात एखादा पदार्थ कमी अधिक झाल्यास चव बिघडते.
3. भोगीची भाजी करताना भाज्या जास्त किंवा कमी प्रमाणात नको. प्रत्येक भाजीचं योग्य प्रमाण ती भाजी अधिक छान करते.