मुंबई : दोन दिवसांत मकर संक्रात सुरू होत आहे. सणासोबतच ज्योतिष शास्त्रातही या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. कारण या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य धनू राशीमधून मकर राशीत प्रवेश करणार आहे. मात्र यावर्षी मकर संक्रांत अतिशय खास आहे. या दिवशी सूर्य आणि शनीचं मकर राशीत मिलन होणार आहे.


२९ वर्षांनंतर जुळून आला योग 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा योगायोग 29 वर्षांनंतर घडला आहे. यापूर्वी 1993 मध्ये मकर राशीत शनि आणि सूर्याची भेट झाली होती. शनि हळूहळू फिरतो आणि अडीच वर्षांत राशी बदलतो आणि पुन्हा त्याच राशीत पोहोचण्यासाठी 30 वर्षे लागतात. मकर संक्रांतीमध्ये उपस्थित असलेला शनि आणि 2 दिवसांनंतर 14 जानेवारी 2022 रोजी सूर्य प्रवेश करणार आहे आणि 3 राशीच्या लोकांना एक मोठी भेट देणार आहे.


३ राशींचं बदलणार नशिब 


सिंह: सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. शनि-सूर्याचा हा संयोग सिंह राशीच्या लोकांना अनेक मोठ्या संधी देईल. या संधी आयुष्य बदलणाऱ्या संधी ठरतील. अशाच या संधी गमावू नका. सूर्य महिनाभर या स्थितीत राहील. हा काळ या राशीच्या लोकांसाठी खूप कौतुक आणेल. बढती-वाढही मिळेल. तुम्हाला सन्मान मिळेल.


धनु : धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आणि सूर्य यांच्यातील मैत्रीमुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. त्यांना मोठा पैसा मिळू शकतो. नोकरीतील बदलामुळे उत्पन्नात मोठी वाढ होईल. एकूणच, हा काळ आर्थिक स्थितीला महत्त्वपूर्ण बळ देईल. कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल आणि त्यासाठी तयारी केली असेल तर यश मिळण्याची दाट शक्यता आहे.


मीन : मीन राशीच्या लोकांसाठीही हा काळ खूप फायदेशीर राहील. कमाई वाढेल. पद आणि पैसा दोन्ही मिळतील. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि समाजात मान-सन्मानही वाढेल. असे लोक जे सरकारी किंवा राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांना महत्त्वाचे पद किंवा जबाबदारी मिळू शकते, जी तुमच्या आनंदाचे कारण बनेल.