Mangal-Surya Yuti : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालांतराने राशी परिवर्तन करतो. या राशी परिवर्तनावेळी कधी कधी दोन किंवा तीन ग्रह एकाच राशीत एकत्र येतात. या स्थितीला युती म्हटलं जातं. लवकरच मंगळ ग्रह आणि सूर्य देव यांची युती होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

17 ऑगस्ट रोजी सूर्य देव सिंह राशीत प्रवेश करणार आहे. याच वेळी, मंगळ या राशीमध्ये आधीच उपस्थित असणार आहे. अशा स्थितीत सूर्य आणि मंगळाचा संयोग होणार असून प्रत्येक राशीच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे.  याचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार असून काही राशींना याचा भरपूर लाभ मिळणार आहे. पाहूयात या राशी कोणत्या आहेत. 


कर्क रास


सूर्य आणि मंगळ यांच्या युतीने कर्क राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तुमचे बरेच दिवस थांबलेले काम आता पूर्ण होईल. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या बोलण्यात सुधारणा होणार असून लोक तुमच्यावर प्रभावित होतील. तुम्हाला तुमचे उधारलेले पैसे परत मिळतील. 


सिंह रास


या दिवसांमध्ये सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. या दिवसात जोडीदारासोबत सुरू असलेले गैरसमज दूर होणार आहेत. परदेशात जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकणार आहे. या दिवसांमध्ये तुम्ही पार्टनरशिपमध्ये कोणताही व्यवसाय सुरू करू शकता. अविवाहित लोक लग्न करू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडू शकतात.


मेष रास


या दिवसात मंगळ आणि सूर्याची युती मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी यश मिळू शकते. कोणताही मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळामध्ये तुमचं मन प्रसन्न असणार आहे. प्रेमसंबंध अधिक घट्ट होणार आहे. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करून तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )