मुंबई : 16 जानेवारी म्हणजे आजपासून मंगळ ग्रह वृश्चिक सोडून धनु राशीत प्रवेश करत आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत मंगळ या राशीत राहणार आहे. त्याचा परिणाम 5 राशींवर वाईट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5 राशीच्या व्यक्तींनी 42 दिवस जपून राहाणं गरजेचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळ ग्रहाचा धनु राशीत होत असलेला प्रवेश हा काहींच्या आयुष्यात खूप उलथापालथ घडवून आणणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना मंगळ ग्रहामुळे पुढचे 42 दिवस अडचणी येऊ शकतात.


वृषभ (Taurus) - आत्मविश्वास कमी झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा आणि नशिबाऐवजी आपल्या कामावर विश्वास ठेवा. या कालावधीमध्ये तणावाचं वातावरण राहू शकतं. वाद घालणे टाळा. रखडलेले पैसे मिळाल्याने आनंद होईल मात्र तो फार काळ टिकू शकणार नाही. 


कर्क (Cancer)- या राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये आव्हानं आणणारा असणार आहे. मन अस्वस्थ होईल.या काळात सतर्क राहाणं फार गरजेचं आहे. शत्रूंपासून जपून राहायला हवं. जे मोठ्या पदावर आहेत, त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम करावं.


कन्या (Virgo)- या राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत सावधगिरी बाळगावी. कोणीतरी तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकते. कौटुंबिक समस्या होऊ शकतात. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या खास व्यक्तीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाद टाळणं फायद्याचं ठरेल. 


वृश्चिक (Scorpio)- बोलताना विशेष काळजी घ्या. नुकसान सहन करावे लागू शकते. कुटुंबाला जास्त वेळ द्या. आरोग्याची काळजी घ्या.


मकर (Capricorn)- करिअर आणि व्यवसायात अडचणी येऊ शकतात. कामाचा ताण वाढेल. भरपूर पैसा खर्च होईल. खर्च नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. तब्येतीची काळजी घ्या, बिघडू शकते.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)