Mangal Gochar 2023 Effect in marathi : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना विशेष महत्त्व आहे. तुमच्या कुंडलीत ग्रह कुठल्या घरात आहे. यावर तुमची आर्थिक परिस्थती, सुख - समृद्धी, करियर आणि आरोग्य अशा अनेक गोष्टींचा उलगडा होतो. ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि कुंडलीचा अभ्यास करु तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अडचणीबद्दल सतर्क केलं जातं. तुम्हाला त्यासाठी उपाय सांगितले जातात. मंगळ या ग्रहाच गोचर होणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांची चांदीच चांदी आहे. मात्र या काळात जर तुम्ही काही चुका केल्या तर मोठ्या अडचणीत सापडू शकता. (Mangal Gochar 2023 Effect Mars Transit 2023 date 13 March these zodiac signs get money but Don't do these things in marathi)


कधी आहे मंगळ गोचर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्रानुसार मंगळ 13 मार्चला सकाळी 5:30 वाजता शुक्र राशीला सोडून मिथुन राशीत पदार्पण करणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी, हे स्थान त्यांचे बोलणे आणि बँक बॅलन्ससह कुटुंबाचं प्रतिनिधित्व करतं. वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळ हा जोडीदार आणि खर्चाचा स्वामी आहे. अशा स्थितीत तो मिथुन राशीत आल्यावर खर्चाबरोबरच गुंतवणुकीवरही भर देईल. जीवनसाथी आणि संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवणे चांगले राहील. दरम्यान, पालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, कारण या राशीच्या लहान मुलाच्या पडण्यामुळे तोंडाला खोल जखम होऊ शकते. नकारात्मक गोष्टींचा त्याग करण्यासाठी हा काळ योग्य ठरेल, तसंच भविष्यासाठी गुंतवणूक करत राहा, लाभ मिळतील.


काही गोष्टी मात्र नक्की टाळा!


  1. या काळात वृषभ राशीच्या लोकांना दौऱ्यावर जाण्याचा योग येणार आहे. त्यामुळे तुम्ही सहलीला जाण्यासाठी तयार राहा. हे तुमच्यासाठी भाषणाचं घर आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. 

  2. ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा तुम्ही स्वतः केलेले काम खराब कराल. संपर्काच्या दृष्टीने वेळ चांगला जाईल. नवीन प्रभावशाली लोकांशी भेट होईल.  

  3.  युवक अभ्यास आणि लव्ह लाइफमध्ये अधिक लक्ष केंद्रित करू शकतात. जर तुम्हाला प्रेम संबंधांमध्ये विशेष काळजी घ्यायची असेल, तर तुमच्या वागण्याने जोडीदाराला त्रास देऊ नका.

  4.  अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला वेळ जाईल आणि परीक्षेत यश मिळेल. 

  5. कौटुंबिक, प्रेमप्रकरणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुमच्या जोडीदाराला नक्कीच सहभागी करून घ्या. 

  6. विनाकारण राग टाळावा, कारण रागामुळे वाणी दूषित होऊ शकते. जास्तीत जास्त मौन धारण करून आपली नकारात्मकता थांबवा. सामाजिकदृष्ट्या तुमचा प्रभाव अधिक वाढेल आणि वरिष्ठांचा आशीर्वाद राहील.

  7.  वडील आणि आजोबांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, तसंच वाहन जपून वापरा, अपघात होण्याची दाट शक्यता आहे.