Mars Transit in Virgo : ऊर्जा, जमीन, शक्ती, धैर्य, शौर्याचा कारक आणि ग्रहांचा सेनापती मंगळाने कन्या राशीत गोचर केल्यामुळे 12 राशींवर त्याचा शुभ आणि अशुभ परिणाम दिसणार आहे. काही राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे. तर काही राशींसाठी तो संकट घेऊन आला आहे. ग्रहांचा सेनापती मंगळ 18 ऑगस्ट 2023 ला कन्या राशी प्रवेश केला असून 3 ऑक्टोबरपर्यंत तो कन्या राशीत विराजमान असणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी तो त्रासदायक ठरणार आहे. या राशींसाठी 3 ऑक्टोबरपर्यंतचा काळ अतिशय कठीण असणार आहे.  (mangal gochar 2023 mars transit in virgo these zodiac signs Financial loss astrology in marathi )


'या' राशींनी राहवं सावधान!


वृषभ (Taurus) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर अतिशय कठीण काळ घेऊन आला आहे.  या राशीच्या लोकांना मुलं आणि शिक्षणाच्या बाबतीत काही समस्या उद्ध्भवणार आहे. मंगळाच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांनी या काळात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात धनहानी होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. काही लोकांशी तुमचे वादविवाद होण्याची शक्यता आहे.


सिंह (Leo)


या राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या बदलामुळे मोठी समस्या निर्माण होणार आहे. या दिवसांमध्ये तुमचा क्रोध आणि आक्रमकता वाढणार आहे. या संक्रमणाच्या नकारात्मक प्रभावामुळे तुमची झालेली कामंही बिघडणार आहेत. तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. अन्यथा तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण होईल. कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागणार आहे. 


कन्या (Virgo)


या राशीच्या लोकांना मंगळाच्या संक्रमणामुळे अतिशय त्रासदायक ठरणार आहे. या लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. स्वभावात आक्रमकता वाढणार आहे. कोणाशीही वाद न घालणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठे नुकसान सहन करावं लागणार आहे. या राशीच्या लोकांनी 3 ऑक्टोबरपर्यंत विशेष काळजी घ्यावी.


कुंभ (Aquarius) 


मंगळाचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक समस्यांना घेऊन येणार आहे. धनहानीसोबतच वडिलोपार्जित संपत्तीवरुन वाद होणार आहेत. घरातील एखाद्या व्यक्तीशी भांडण होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही मानसिक तणावाखालीही येणार आहात. करिअरच्या बाबतीतही चढ उतार पाहावे लागणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Vipreet Rajyog : 'या' राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना खूपच खास; अचानक धनलाभ होण्याची शक्यता!


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)