Mangal Gochar 2023 : अनेकांसाठी मंगळ जरी अनलकी वाटत असला तरी पुढील महिन्यात मंगळ गोचरमुळे अनेकांना मोठा धनलाभ होणार आहे. (Mangal Gochar ) मंगळाचा शाब्दिक अर्थ 'शुभ' असा आहे. त्याला 'भूमी' म्हणजेच पृथ्वीपुत्र असेही म्हणतात. त्याला महाराष्ट्रात भगवान गणेश, उत्तर भारतात बजरंगबली आणि दक्षिण भारतात कार्तिकेय समानार्थी मानले जाते. पुढील महिन्यात मंगळ गोचर होत असल्याने याचा खूप मोठा लाभ हा 4 राशींच्या लोकांना होणार असून त्यांच्या हाती पैसाच पैसा येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी मंगळ गोचर होते तेव्हा ते अनेक राशींच्या लोकांचे जीवन फुलण्यास मदत होते. तो पुढील महिन्यात म्हणजेच 13 मार्च 2023 रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या या गोरचमुळे होळीनंतर अनेक राशींच्या घरात पैसे जमा होतील.  


मंगळ गोचरमुळे या राशींचे भाग्य उजळणार


वृषभ 


मंगळ गोचरमुळे या राशींचे लोक आपल्या जोडीदारासोबत अधिकची संपत्ती वाढवण्यात यशस्वी होतील. तुम्हाला पालक आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांची गाडी पुढे सरकेल. तंत्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना मंगळ देवाचा पूर्ण आशीर्वाद मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. मंगळ गोचरमुळे काही दिवसात चांगले परिणाम दिसून येतील.  दुर्गा मातेची नियमित पूजा करा आणि तिला लाल फुले अर्पण करा. तुम्हाला लाभ मिळेल.


सिंह  


मंगळाच्या संक्रमणामुळे (Mangal Gochar 2023) होळीनंतर या राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. पगारात वाढ होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक मोठी रक्कम मिळू शकते. जर तुम्ही नवीन व्यवसायाची योजना आखत असाल तर मंगळ गोचर काळ तुमच्यासाठी उत्तम राहील. न्यायालयीन प्रकरणे तुमच्या बाजूने सुटू शकतात. मंगळ देवाला प्रसन्न करण्यासाठी बजरंगबलीची पूजा करा आणि प्रत्येक मंगळवारी मिठाई दान करा. 


मकर


मकर राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. ते कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा किंवा स्पर्धेत चांगली कामगिरी करतील. कामानिमित्त परदेशात जावे लागू शकते. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढू शकतो, परंतु उत्पन्नाचे स्त्रोत वाढल्याने ही समस्या दूर होईल. विरोधक तुम्हाला विनाकारण वादात अडकवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे शांत राहा आणि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा.  दररोज गुळाचे सेवन करावे. 


मीन


मंगळाच्या राशी बदलामुळे  (Mangal Gochar 2023) या राशीच्या लोकांसाठी नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा योग आहे. त्यांना वडिलोपार्जित मालमत्ताही मिळू शकते. कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी येणारा काळ चांगला जाणार आहे. व्यावसायिक जीवनात तुम्ही असेच पुढे जात राहाल. या राशीचे लोक आपल्या जीवनसाथीबद्दल पझेसिव्ह होऊ शकतात, त्यामुळे घरात भांडणे होऊ शकतात. त्यामुळे सावध राहा आणि प्रेमाने गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा.  त्यात तुम्हाला यश येईल.


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)