पुढच्या 2 दिवसात पलटणार या राशींचं नशीब, आर्थिक भरभराटीचे संकेत
भूमी, धैर्य, पराक्रम, विवाह, भाऊ यांचा करक ग्रह मंगळ 27 जून रोजी आपली रास बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे.
मुंबई : भूमी, धैर्य, पराक्रम, विवाह, भाऊ यांचा करक ग्रह मंगळ 27 जून रोजी आपली रास बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे.
मंगळाचे संक्रमण जीवनातील महत्त्वाच्या पैलूंवर परिणाम करतात. 27 जून रोजी मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा परिणाम तीन राशींवर खूप चांगला होईल. हे संक्रमण 4 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे.
मिथुन - मंगळ गोचरामुळे मिथुन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतील. पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरदार वर्गाला बढती मिळेल. व्यावसायिकांसाठीही हा काळ खूप फायदेशीर आहे. वडिलांचे सहकार्य मिळेल. विवाहित जोडप्यांच्या जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी मेष राशीमध्ये मंगळाचा प्रवेश खूप शुभ आहे. पैसे मिळण्याचे संकेत आहेत. धैर्य वाढेल, करिअरसाठी हा काळ उत्तम राहील. कुटुंबात आनंदाचे आणि सहकार्याचे वातावरण राहील. शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. मेहनत करत राहा, यश नक्की मिळेल.
वृश्चिक - मंगळाच्या भ्रमणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. याच्या जोरावर ते प्रत्येक काम सहजतेने पूर्ण करत जातील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल, ज्यामुळे आनंद मिळेल. पुरेशी रक्कम मिळाल्याने आर्थिक अडचणी दूर होतील.
धनु - मंगळाचे संक्रमण धनु राशीच्या लोकांना अनेक बाबतीत लाभ देईल. आरोग्य चांगले राहील. उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)