Mangal Dosh:कुंडलीत मंगळ कमकुवत असल्यास असा त्रास होतो, या उपायांनी दूर करा समस्या
Mangal Grah: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल असते. जातकाला काही ग्रहांची साथ मिळते. तर काही ग्रह कमकुवत स्थितीत असल्याने त्रास जाणवतो. कुंडलीत ग्रहांची स्थिती वाईट असेल तर जातकाला त्या ग्रहाच्या स्वभावाप्रमाणे समस्या उद्भवतात.
Mangal Grah Weak In Kundali: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल असते. जातकाला काही ग्रहांची साथ मिळते. तर काही ग्रह कमकुवत स्थितीत असल्याने त्रास जाणवतो. कुंडलीत ग्रहांची स्थिती वाईट असेल तर जातकाला त्या ग्रहाच्या स्वभावाप्रमाणे समस्या उद्भवतात. त्यामुळे कुंडलीतील कोणता ग्रह कमकुवत आहे याबाबत जाणून घेणं गरजेचं आहे. मंगळ हा ग्रह साहस आणि शौर्याचा प्रतिक आहे. अशात कुंडलीत मंगळ ग्रह नीचेचा असेल तर व्यक्तीला काही संकेत मिळतात. जर तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर कुंडलीतील ग्रहांची स्थिती तपासून घ्या. मंगळ ग्रह कमकुवत असेल तर पुढे दिलेले उपायांमुळे फायदा होऊ शकतो.
व्यक्तींना हे आजार भेडसावतात- ज्योतिषशास्त्रानुसार जातकाला उच्च रक्तदाब, गाठ, पिंपल्स किंवा मुतखड्याची समस्या जाणवत असेल, तर कुंडलीत मंगळाची स्थिती खराब असल्याचे संकेत आहेत.
न्यायालयीन प्रकरण- आजारपणाव्यतिरिक्त जातकांना इतर समस्याही जाणवू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा मंगळ ग्रह खराब असल्यास न्यायालयीन प्रकरणात अडकण्याची शक्यता असते. कोणत्याही व्यक्तीसोबत पटत नाही. भावंडांसोबत कायम वाद होत राहतो. संतान प्राप्तीमध्येही अडचणी येतात.
बातमी वाचा- Mangal Grah Margi 2023 : 11 दिवसानंतर मंगळ होणार मार्गस्थ, या स्थितीमुळे 3 राशींचं अर्थकारण बदलणार
या कामांमुळे मंगळ कमकुवत होतो
ज्योतिषशास्त्रानुसार जातकाचा स्वभाव मंगळ कमकुवत करण्यास कारणीभूत ठरतो. चुकीचं पद्धतीने वागणं मंगळ ग्रह आणखी कमकुवत करतो. जास्तीचा त्रागा करून राग व्यक्त करणे, मास आणि दारुचं सेवन करणं, तसेच मारुतीरायाचा अपमान केल्याने व्यक्तीचा मंगळ ग्रह खराब होतो. तसेच मित्र आणि भावंडांची फसवणूक केल्यास मंगळाच्या अशुभ प्रभाव प्रखरतेने जाणवतो.
मंगळ ग्रहाचा शुभ परिणाम मिळवण्यासाठी उपाय
जातकाच्या कुंडलीत मंगळ कमकुवत असल्यास मंगळवारी सुंदरकांडचं पठण करावं. हनुमान चालीसा, बजरंग बाण यांचा पाठ करावा. तसेच भावंडं आणि मित्रांसोबत चांगला व्यवहार ठेवावा. गाईला चारा द्यावा, तसेच गोड तंदुरी रोटीचं दान करावं. यामुळे लाभ मिळतो.
दुसरीकडे, वाहत्या पाण्यात रेवडी आणि बताशे टाकावेत. रागावर नियंत्रण ठेवावं. मंगळवारी लाल रंगाचे कपडे परिधान करावे. लाल रंगाच्या कपड्यात बडीशेप बांधून बेडरुममध्ये ठेवा. या व्यतिरिक्त गहू, तांबा, लाल कपडा, माचिस आणि गुळाचं दान फलदायी ठरतं. यामुळे मंगळाची कृपा मिळते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)