Mangalwar Totke : हिंदू धर्मात प्रत्येक देवासाठी एक दिवस समर्पित करण्यात आला आहे.  मंगळवार जसा गणपतीचा दिवस म्हणून ओळखला जातो तसाच तो हनुमानजीची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक देवाला प्रसन्न करण्यासाठी विधीवत पूजा अर्चा करणे गरजेचं आहे. यात जर काही चूक झाली तर देव नाराज होतात, असं शास्त्रात मानलं जातं. जर तुम्हाला तुमच्या पूजेचे शुभफळ प्राप्त व्हावे असं वाटत असेल तर चुकूनही हनुमानजीची पूजा करताना काही चूका करु नका.  (Mangalwaar Upay or Mangalwar Totke Tuesday upay hanuman puja do not commit these mistake Astro marathi news)


मंगळवारी या चुका करू नका!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. दुधापासून बनवलेले मिठाई चुकूनही हनुमानजींना अर्पण करू नये, यामुळे बंजारबली नाराज होतात. तर हनुमानजींना बुंदी, बसेनचे लाडू अर्पण करावेत, हे देवाला खूप प्रिय आहे.


2. मंगळवारी मांस सेवन करू नये. त्यांचे सेवन केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.


3. जर तुम्ही मंगळवारी बजरंगबलीचे व्रत ठेवले तर चुकूनही या दिवशी मीठाचे सेवन करू नये.


4. या दिवशी दिलेले कर्ज परत येत नसल्याने मंगळवारी कोणीही उधारीवर पैसे देऊ नये. त्यामुळे या दिवशी खूप विचार करूनच एखाद्याला पैसे द्या, कारण नंतर तुम्हाला ते पैसे परत मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील.


5. मंगळवारी ब्रह्मचर्य पाळावे.  हनुमानजींनी आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळलं त्यामुळे त्यांना असे भक्त आवडतात. 


6. मंगळवारी पश्चिम आणि उत्तर दिशेला प्रवास करू नये. या दिवशी प्रवास करावा लागला तरी गूळ खाऊन घरातून बाहेर पडा.


7. या दिवशी शुक्र आणि शनिशी संबंधित कोणतेही काम करू नये. या दिवशी लाल किंवा केशरी रंगाचे कपडे देखील घालावेत. लक्षात ठेवा या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करू नका. 


8. मंगळवारी आपण नखे आणि केस कापू नयेत, दाढी करू नये. या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे.


9. या दिवशी लक्षात ठेवा की कोणाशीही वाद घालू नका, कारण मंगळवारच्या दिवशी शुभ कार्य केले नाही तर आयुष्यभर संघर्ष करून पश्चाताप करावा लागू शकतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)