मुंबई : हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व देण्यात आलं आहे. घराची वास्तू बरोबर असेल तर घरात सुख-समृद्धी आणि सुख-समृद्धी टिकून राहते. याशिवाय घरामध्ये पसरलेली नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जेत रूपांतरित होऊन घरातील लोकांना फायदा होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तूनुसार घरातील प्रत्येक वस्तू ठेवल्यास जीवनात अनावश्यक समस्यांना सामोरं जावं लागत नाही. आजकाल प्रत्येक व्यक्ती वास्तुशास्त्रानुसार घर बांधून घेतो. वास्तूच्या नियमांचं पालन करून ती कोणत्या दिशेला ठेवणे योग्य आहे, या गोष्टींवर विशेष लक्ष दिले जातं. घराच्या पायऱ्यांबाबत देखील वास्तुशास्त्रात अनेक नियम आहेत. काय आहेत हे नियम जाणून घेऊया.


घराच्या पायऱ्या कोणत्या दिशेला असाव्यात


वास्तुशास्त्रानुसार, घराच्या पायऱ्या नैऋत्य दिशेला असणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य टिकून राहतं. घराच्या मध्यवर्ती भागाला ब्रह्मदेवाचे स्थान मानले जाते, त्यामुळे मध्यभागी पायऱ्या नसाव्यात. घराची उत्तर-पूर्व दिशा देखील पायऱ्यांसाठी योग्य मानली जात नाही. याशिवाय घराच्या ईशान्य दिशेला जिने बनवणं टाळावं. 


पायऱ्यांच्या खाली काय ठेवावं?


पायऱ्यांखाली जागा असल्यामुळे आपण अनेक वस्तू तिथे ठेवतो, पण असे करू नये. पायऱ्यांखाली अग्निशी संबंधित कोणतीही वस्तू ठेवू नका. स्वयंपाकघर आणि पूजा घर देखील पायऱ्यांखाली बांधू नये. यामुळे घरात नकारात्मक उर्जेचा संचार वाढतो.


शूज, चप्पल आणि निरुपयोगी वस्तू पायऱ्यांखाली ठेवणेही टाळावं. त्यामुळे मुलांच्या तब्येतीत बरेच चढ-उतार होतात. याशिवाय घरमालकाच्या आयुष्यातही अनेक समस्या येतात. पायऱ्यांखाली तुम्ही रोपं लावू शकता.