मुंबई : आजच्या जगात बरेच लोक स्वत:च ठरवून लग्न करतात, म्हणजेच ते लव्ह मेरेज करतात. परंतु अजूनही असे बरेच लोक आहेत. जे ठरवून म्हणजेच घरच्यांच्या पसंतीने लग्न करतात. अशावेळी मुलगी बघण्याचा कार्यक्रम असतो. तेव्हा बरेच लोक आपल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत तेथे जातात आणि पसंतीचा कार्यक्रम पार पाडतात. परंतु अशावेळी अनेक लोक अशा काही चुका करतात. ज्यामुळे त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे मुलगी पाहायला जाताना कोण-कोणत्या चुका करायला नको? हे जाणून घ्या.


लग्नासाठी काही टिप्स...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सात फेरे सात जन्मांसाठी असतात. ज्यामुळे नवरा-बायको सातजन्मासाठी एकमेकांचे होतात असे म्हटले जाते. परंतु जोडीदाराची निवड चुकली, तर एक जन्मही एकत्र राहाणे त्यांना कठीण होऊन बसतं. अशा परिस्थितीत आचार्य चाणक्य सांगतात की, जोडीदार निवडताना मग तो मुलगा असो की मुलगी, फक्त रुपरेषा विचारात न घेता, त्यांचे मतही विचारात घेतले पाहिजे. तर आणि तरच त्यांचं नातं टिकू शकतं.


त्यामुळे मुलगी पाहायला जाताना तिचं स्त्रीचे सौंदर्य पाहून तिची निवड करणे हा चुकीचा निर्णय असू शकतो. सुंदर गोष्टी नेहमीच चांगल्या असतात असे नाही. त्यामुळे जरा सांभाळून.


मुलगी वागायला बोलायला कशी आहे हे पाहा. या शिवाय तिचा स्वभाव कसा आहे? ती व्यवहारी आहे की नाही हे देखील पाहाणं महत्वाचं आहे. कारण मुलगी जर व्यवहारी असली, तरच ती आपला संसार चालवू शकते आणि आपल्या नवऱ्याच्या वाईट वेळेत, त्याला मदत करु शकेल.


तसेच मुलीची लग्न करण्याची इच्छा असणे जास्त महत्वाचं आहे. कारण तिच्या इच्छे शिवाय लग्न केलं तर ती संसार चालवू शकेल की, नाही हा प्रश्न उपस्थीत आहे.


मुलीला कोणत्या दुसऱ्या मुलावर प्रेम असेल आणि तरी देखील तिच्या घरातील लोक तिचं लग्न तुमच्यासोबत करुन देत असतील, तर अशा मुलीशी देखील लग्न करु नका, कारण ती तुमच्यावर कधीही प्रेम करु शकणार नाही.