Surya-Mangal Yuti: 2 ग्रहांची महायुतीमुळे `या` राशींवर पडणार पैशांचा पाऊस; आयुष्यात येणार आनंदाचे क्षण
Mars Sun Conjunction: सध्या सूर्य कन्या राशीत आहे. यावेळी मंगळाच्या उपस्थितीमुळे कन्या राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा संयोग तयार होतो. सूर्य आणि मंगळाची ही स्थिती 4 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे.
Mars Sun Conjunction: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट अंतराने राशी परिवर्तन करतो. यावेळी एक ग्रह दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. याला ग्रहांचं गोचर असेही म्हणतात. या ऑक्टोबरमध्येही अनेक ग्रहांचं गोचर होणार आहे.
सध्या सूर्य कन्या राशीत आहे. यावेळी मंगळाच्या उपस्थितीमुळे कन्या राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा संयोग तयार होतो. सूर्य आणि मंगळाची ही स्थिती 4 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत हा काळ काही राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे. जाणून घेऊया सूर्य आणि मंगळ यांची युती कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे.
मेष रास
ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ आणि सूर्याची युती मंगळात निर्माण झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांना 4 ऑक्टोबरपर्यंत फायदे मिळणार आहेत.सूर्य आणि मंगळाच्या कृपेने या काळात जमिनीच्या वादातून सुटका मिळू शकणार आहे. या काळात व्यक्तीला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. 4 ऑक्टोबर रोजी काही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहणार आहे. या काळात व्यवसाय आणि नोकरीमध्ये सकारात्मक आर्थिक लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकतं. नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. मुलांकडून आणि सासरच्या लोकांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात आधी केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीसाठी हा काळ वरदान ठरणार आहे. 4 ऑक्टोबरपर्यंतचा काळ व्यवसाय आणि नोकरीसाठी खूप खास असणार आहे. व्यवसायात यावेळी आर्थिक लाभ होणार आहे. मालमत्तेशी संबंधित कामात आर्थिक लाभ होईल. व्यावसायिकांना अधिक नफा मिळविण्याच्या संधीही मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी तुम्ही सहलीला जाऊ शकता.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )