Surya And Mangal Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या कालावधीनंतर आपल्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ते इतर ग्रहांशी संयोग करतात. दोन ग्रहांच्या संयोगाचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. येत्या काळात असाच एक संयोग तयार होणार आहे, ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तूळ राशीमध्ये ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांचा संयोग होणार आहे. हा संयोग तब्बल 1 वर्षानंतर तयार होणार आहे. सूर्य आणि मंगळ यांच्या युतीचा हा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. पण यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांना यावेळी अचानक आर्थिक लाभ होणार आहे. जाणून घेऊया मंगळ आणि सूर्याचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. 


मकर रास 


मंगळ आणि सूर्य यांच्या संयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात विशेष लाभ मिळणार आहे. त्यांच्या कामाचं कौतुक होणार आहे. दरम्यान तुमचा नफा वाढू शकतो. व्यवसायातही नवीन कल्पनांवर काम कराल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. शेअर मार्केटमधून भरपूर पैसा हाती लागणार आहे. 


कुंभ रास


कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि सूर्याची युती अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्हावा नशीबाची साथ मिळू शकणार आहे. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता, जे शुभ ठरू शकते. पैसे मिळवण्याच्या अनेक संधीही मिळतील. कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तुमचे उत्पन्न वाढेल. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचं आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे.


मिथुन रास


मंगळ आणि सूर्याचा योग तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. नशीब तुमच्या बाजूने असू शकते. यावेळी इच्छा पूर्ण होऊ शकतात. प्रलंबित कामातही यश मिळू शकते. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )