Mangal Gochar: 27 डिसेंबरला मंगळ करणार राशी बदल; `या` राशींना धनलाभाची शक्यता
Mangal Gochar In Dhanu: ग्रहांचा सेनापती आणि पुत्र मंगळ ग्रह 27 डिसेंबर रोजी रात्री 11.40 वाजता धनु राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत मंगळ धनु राशीत प्रवेश केल्याने काही राशींना फायदा होणार आहे.
Mangal Gochar In Dhanu: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येत ग्रह त्याच्या निश्चित वेळी राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांचा सेनापती आणि पुत्र मंगळ ग्रह 27 डिसेंबर रोजी रात्री 11.40 वाजता धनु राशीत प्रवेश करणार आहे. धनु ही गुरूची राशी आहे आणि गुरू आणि मंगळ यांच्यामध्ये शत्रूत्वाची भावना आहे. अशा स्थितीत मंगळ धनु राशीत प्रवेश केल्याने काही राशींना फायदा होणार आहे. जाणून घेऊया मंगळाच्या गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.
मेष रास (Mesh Zodiac)
मंगळ धनु राशीत प्रवेश करेल आणि या राशीच्या नवव्या घरात प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यासोबतच प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. बृहस्पतिच्या राशीत बदलामुळे तुमचे भाग्य मजबूत होणार आहे. अपत्यप्राप्तीची इच्छा असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते.
तूळ रास (Tula Zodiac)
या राशीत मंगळ तिसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनावर अनुकूल प्रभाव पडू शकतो. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुम्ही एकमेकांना भेटवस्तू देऊ शकता. भावा-बहिणींशी चांगले संबंध निर्माण होतील. व्यवसायातही फायदा होऊ शकतो. नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. तज्ञांच्या सल्ल्याने शेअर मार्केटमध्ये नफा होऊ शकतो. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल आणि तुमच्या विरोधकांवरही विजय मिळवाल.
धनु रास (Dhanu Zodiac)
या राशीमध्ये मंगळ पहिल्या घरात प्रवेश करणार आहे, अशा स्थितीत या राशीमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास वाढणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आयुष्यात अचानक एखादी घटना घडू शकते. परदेशातून कोणत्याही प्रकारे लाभ मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहे. नोकरी बदलण्याची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )