Mars Rise In Sagittarius, Mangal Uday 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करतात. मुळात प्रत्येक ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये बदल करतात. 16 जानेवारी रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाचा धनु राशीत उदय झाला आहे. मंगळ हा भूमी, धैर्य, शौर्य, शक्ती आणि उर्जेचा कारक मानला जातो. मंगळवारी रात्री 11:07 वाजता मंगळाचा उदय झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळ ग्रहाच्या उदयामुळे प्रत्येक राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. यावेळी काही लोकांना करिअरमध्ये फायदा होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी मंगळ ग्रहाचा उदय लकी ठरणार आहे. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता.


सिंह रास (Leo)


धनु राशीतील मंगळाचा उदय सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून लाभ होणार आहे. नवीन घर आणि वाहन खरेदीची शक्यता आहे. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय किंवा नोकरी सुरू करू शकता. करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. यश मिळू शकणार आहे. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांनाही मंगळाच्या उदयाचा फायदा होईल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. नफ्यासोबत आर्थिक लाभही होण्याची दाट शक्यता आहे. प्रवासाचे बेत आखता येतील. पैशांची बचत होण्यास यश मिळेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे.


मेष रास (Aries)


या राशीच्या लोकांनाही मंगळाच्या उदयाचा फायदा होणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. दीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. नोकरीत नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यावसायिकांना फायदा होणार आहे. यावेळी आर्थिक स्थिती मजबूत होईल.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांना मंगळाच्या उदयाचा फायदा होणार आहे. शेअर बाजार किंवा योजनांमध्ये गुंतवणूक करून फायदा होऊ शकतो. भावंड आणि मित्रांशी संबंध चांगले राहतील. करिअरमध्येही फायदा होणार आहे. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )