Masik Shivratri : चैत्र मासिक शिवरात्रीला दुर्मिळ संयोग! `या` 4 राशींवर बरसणार भोलेनाथांची कृपा
Masik Shivratri : आज चैत्र महिन्यातील मासिक शिवरात्री आहे. आज भद्रवास योगासह अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. याचा फायदा खास करुन चार राशींच्या लोकांना होणार आहे.
Masik Shivratri : हिंदू धर्मात पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात मासिक शिवरात्री येत असते. चैत्र महिन्यातील मासिक शिवरात्री 6 मे दुपारी 2:41 वाजता सुरू होणार आहे. तर 7 मे सकाळी 11:40 वाजेपर्यंत असणार आहे. मासिक शिवरात्रीच व्रत हे भगवान शंकराची उपासना करण्यासाठी असतं. तर सोमवार हा वार भोलेनाथाची पूजा करण्याचा दिवस आहे. अशात सोमवारीच मासिक शिवरात्री आल्यामुळे दुर्मिळ योग जुळून आलाय. यादिवशी भद्रवास योग, प्रीती योग आणि आयुष्मान योग निर्माण झाला आहे. (Masik Shivratri rare combination of Chaitra monthly Shivratri Bholenath grace will shower on these 4 zodiac signs)
ग्रहांची स्थिती पाहिल्यास सूर्य आणि शुक्र मेष राशीत, मंगळ आणि बुध मीन राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनि कुंभ राशीत संक्रमण करत आहे. या संयोगाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम पडणार आहे. मात्र चैत्र शिवरात्रीचा हा शुभ संयोग चार राशींसाठी खूप खास ठरणार आहे. भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद या लोकांवर बरसणार आहे.
मकर (Capricorn Zodiac)
या राशीच्या लोकांवर भोलेनाथाचा विशेष आशीर्वाद लाभणार आहे. करिअर आणि व्यवसायात या लोकांना दुप्पटीने लाभ मिळणार आहे. गुंतवणुकीसाठी हा दिवस चांगला असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. यश तुमच्या दारावर येणार आहे.
कर्क (Cancer Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी चैत्र महिन्याची शिवरात्री लाभदायक ठरणार आहे. कोणतेही नवीन काम करण्यासाठी हा शुभ दिवस आहे. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होणार आहे. तुमचे अनेक दिवस अडकलेले पैसे परत तुम्हाला मिळणार आहे.
हेसुद्धा वाचा - Weekly Horoscope : 6 मेपासून या राशींसाठी गोल्डन टाइम, अक्षय्य तृतीयाचा आठवडा तुमच्यासाठी कसा?
कुंभ (Aquarius Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी मासिक शिवरात्री फलदायी सिद्ध होणार आहे. जी लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे. करिअरमध्ये तुमची प्रगती होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ असणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणार आबे.
सिंह (Leo Zodiac)
या राशीच्या लोकांवरही भगवान शंकराची विशेष कृपा बरसणार आहे. यश तुमच्या सोबत असणार आहे. व्यवसायात लाभ होणार आहे. घर, वाहन आणि जमीन खरेदीसाठी हा काळ शुभ असणार आहे. गुंतवणुकीवर फायदा होऊ मिळणार असून कुटुंबात आनंदाच वातावरण असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)