Diwali या शब्दाचा अर्थ माहितीये, या सणाविषयी तुमचं General Knowledge किती?
Diwali 2022 : वाणसामान भरलं, फराळाला सुरुवात झाली, खरेदीची लगबगही सुरु झाली. कारण, दिवाळी जवळ आलीये. पण, ज्या शब्दाचा आपण इतका जास्त वापर करतो, त्याचा अर्थ माहितीये का?
Diwali 2022 : वाणसामान भरलं, फराळाला सुरुवात झाली, खरेदीची लगबगही सुरु झाली. कारण, दिवाळी जवळ आलीये. पण, ज्या शब्दाचा आपण इतका जास्त वापर करतो, त्याचा अर्थ माहितीये का?
Diwali 2022 : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी साधारण महिन्याभरापासूनच बाजारपेठा सजल्या आहेत. आता घराघरामध्ये फराळाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. असं असतानाच दुसरीकडे दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या परिजनांना द्यायच्या तरी कशा, याबाबतचा विचार करण्यासाठी शक्कलही लढवली जात आहे. या साऱ्यामध्ये तुम्हाला दिवाळी, या शब्दाचा अर्थ माहितीये? असा प्रश्न विचारल्यास? दिवाळीविषयी या आणि अशाच प्रश्नांची उत्तरं, रंजक माहिती नक्की वाचा...
अधिक वाचा : Diwali 2022 : धनत्रयोदशीला 'या' मंदिरात जाऊन दर्शन घ्या, तुम्ही धनवान व्हा!
दिवाळीविषयीची रंजक माहिती.... (Fun Facts about diwali)
- अनेकांनाच वाटतं की दिवाळी हा सण फक्त हिंदू साजरा करतात. पण, तसं नाहीये हा सण शीख आणि जैन समुदायातही साजरा केला जातो.
- दिवाळी दरवर्षी पाच दिवस साजरा केली जाते. हा सण दरवर्षी येत असला तरीही त्याची तारीख मात्र बदलते. चंद्राच्या स्थितीवर दिवाळीची तारीख ठरते.
- दिवाळीला बऱ्यादा दीपावली म्हणूनही संबोधलं जातं. या शब्दाचा संस्कृत भाषेतील अर्थ होतो, दिव्यांची रांग (row of lights). म्हणूनच दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध प्रकारच्या दिव्यांची आरास घराघरांमध्ये केली जाते.
अधिक वाचा : Diwali 2022: वास्तुशास्त्रानुसार अशी करा दिवाळीची साफसफाई, नाहीतर लक्ष्मी होईल नाराज
- दिवाळीला लक्ष्मीची पूजा केली जाते. असं म्हणतात, की या दिवसांमध्ये दिवे यासाठी लावले जातात जेणेकरुन लक्ष्मीला (Laxmi pujan) सर्वांच्याच घरात जाण्यासाठी वाट सापडेल आणि प्रत्येकाच्याच घरात भरभराट नांदेल.
- बंगाल प्रांतात दिवाळीदरम्यान कालीमातेची पूजा केली जाते. अशी समजूत आहे की देवीच्या या रुपानं दिवाळीदरम्यान वाईटावर विजय मिळवला होता.
- भारताबाहेर, युनायटेड किंग्डम (UK) येथे असणाऱ्या leicester येथे मोठ्या प्रमाणात दिवाळीची धूम पाहायला मिळते. दरवर्षी इथे हजारोंच्या संख्येनं नागरिक एकत्र येत हा सण साजरा करतात.