Kendra Tirkon Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी बुध ग्रह देखील विशिष्ट कालावधीनंतर राशिचक्र बदलतो, ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. बुध ग्रहाने 26 मार्च रोजी मीन राशी सोडून पहाटे 2.39 वाजता मेष राशीत प्रवेश केला आहे. 9 एप्रिलपर्यंत तो या राशीत राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध मेष राशीच्या चढत्या घरात स्थित आहे आणि मकर राशीच्या चौथ्या घरात म्हणजेच केंद्रस्थानी प्रवेश करणार आहे. यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. हा राजयोग अनेक राशींना लाभ देणारा ठरणार आहे. जाणून घेऊया केंद्र त्रिकोण राजयोगामुळे कोणत्या राशींच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत.


मकर रास (Makar Zodiac)


मकर राशीतील चौथ्या घरात केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. अशा परिस्थितीत हा योग या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. यासोबतच तुम्हाला घर खरेदीसाठी कर्ज मिळू शकते. भविष्यासाठी, तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करू शकता. पालकांचे आरोग्यही चांगले राहणार आहे. अशा स्थितीत तुम्हाला कमी तणाव जाणवू शकतो. कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. 


वृषभ रास (Vrishbha Zodiac)


या राशीमध्ये बाराव्या घरात केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. जर तुम्ही परदेशी व्यवसायात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कर्ज मिळू शकते. लव्ह लाईफच्या बाबतीत तुम्हाला फायदा होऊ शकतो. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास करण्याची संधी मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. 


कन्या रास (Kanya Zodiac)


या राशीमध्ये नवव्या घरात केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. या राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये काही बदल दिसू शकतात. नेतृत्व क्षमता वाढू शकणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या कामात काही बदल करायला आवडेल. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत सहलीला जाऊ शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. मानसिक आरोग्यही चांगले राहणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)