Guru Planet Budh And Shani Dev Vakri : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांची रास आणि गती बदलतात. यावेळी ग्रह ठराविक वेळी वक्री तसंच मार्गी होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर होताना दिसून येतो. यावेळी ग्रहांच्या बदलाच्या स्थितीचा काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक तर काही राशींच्या व्यक्तींना नकारात्मक परिणाम मिळतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्म आणि न्याय देणारे शनिदेव, व्यवसाय देणारा बुध आणि समृद्धी देणारा बृहस्पति म्हणजे गुरु हे तीन ग्रह वक्री झाले आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. मात्र यावेळी 3 राशींच्या व्यक्ती अशा आहेत ज्यांना याचा चांगला फायदा मिळणार आहे. शनि, गुरु आणि बुध यांच्या वक्री स्थितीने काहींची करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. 


धनु रास (Dhanu Zodiac)


धनु राशीच्या लोकांसाठी गुरु, शनी आणि बुध ग्रहांची वक्री गती शुभ सिद्ध होणार आहे. या काळात नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. समाजातही तुम्हाला मान-प्रतिष्ठा मिळेल. तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे वर्तन चांगले राहील. आर्थिक समस्या दूर होऊ शकते. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. 


वृषभ रास (Taurus Zodiac)


गुरू, शनि आणि बुध यांची वक्री चाल तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. एखाद्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. शत्रूंवर विजय मिळवणे सोपे जाईल, ज्यामुळे अनेक समस्या दूर होऊ शकतात.


कन्या रास (Kanya Zodiac)


कन्या राशीच्या लोकांसाठी गुरु, शनि आणि बुध ग्रहांची वक्री गती आर्थिकदृष्ट्या शुभ सिद्ध होणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे. जी ​​कामं प्रलंबित होती ती पूर्ण करता येणार आहेत. आर्थिक क्षेत्रातही वाढ होण्याची चिन्हे आहेत. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )