Budh Asta 2023 in Kanya Rashi: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक काळानुसार, त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. म्हणजेच सर्व ग्रह वेळोवेळी आपली चाल बदलतात. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. बुध ग्रह हा देखील शिक्षण, गणित, लेखन, तर्क, मुद्रण, ज्योतिष, व्यवसाय इत्यादींसाठी जबाबदार ग्रह मानला जातो. अशा स्थितीत बुधाच्या अस्तामुळे सर्व राशींना या क्षेत्रांत नफा-तोटा सहन करावा लागू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषीय माहितीनुसार, 3 राशी आहेत ज्यांना या काळात आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात लाभ मिळणार आहेत. 8 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह अस्त झाला आहे. बुध ग्रहाच्या अस्तामुळे काही राशींना जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतील. चला जाणून घेऊया बुध ग्रहाच्या अस्ताचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे.


मेष रास


मेष राशीच्या लोकांना बुधाच्या अस्तामुळे लाभ होऊ शकणार आहे. या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात किंवा अन्य माध्यमातून पैसे गुंतवले आहेत त्यांनाही आर्थिक फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन आणि फायदेशीर ऑफर देखील मिळू शकतात. तुम्हाला मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो. अनेक अडचणींवर मात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.


कर्क रास


कर्क राशीच्या लोकांना बुधाच्या अस्तामुळे फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला व्यापार आणि व्यवसाय क्षेत्रातही लाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. शेअर बाजार किंवा लॉटरीमध्ये नशीब आजमावणारे लोक या काळात पैसे मिळवू शकतात. ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या काळात नफा मिळू शकतो. कुटुंबातील सर्व समस्या दूर होऊ शकणार आहेत.


वृश्चिक रास


ज्योतिषीय गणनेनुसार, वृश्चिक राशीच्या लोकांना बुधाच्या अस्तामुळे लाभ मिळू शकणार आहे. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त आहे. अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतात. बुध अस्ताच्या कालावधीत, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील उपलब्ध होऊ शकतात. कार्यक्षेत्रातही तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात आणि जीवनात नवीन यशाचा मार्ग खुला होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता वाढू शकते. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )