Budh Uday 2024: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरचा प्रत्येक राशीच्या व्यक्तीवर काही ना काही परिणाम होत असतो. ग्रह राशीत बदल करण्यासोबत अस्त आणि उदय देखील होतात. ग्रहांचा राजकुमार फेब्रुवारीच्या सुरुवातीला म्हणजे 8 फेब्रुवारीला मकर राशीत अस्त झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर 15 मार्च रोजी मीन राशीमध्ये बुध ग्रहाचा उदय होणार आहे.बुध 7 मार्च रोजी सकाळी 9.21 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत बुधाचा उदय अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो. यावेळी बुध ग्रहाच्या उदयामुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले क्षण येणार आहेत. जाणून घेऊया बुध ग्रहाच्या उदयामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.


वृषभ रास (Vrishabha Zodiac)


या राशीमध्ये बुध अकराव्या भावात उदय होणार आहे. या राशीच्या लोकांना उत्पन्न वाढीसोबत प्रचंड आर्थिक लाभही होणार आहे. या काळात तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. शेअर बाजारात प्रवेश करणे फायदेशीर ठरू शकतं. यासोबतच आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळतील. मोठ्या करारावर स्वाक्षरी करून भरपूर पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. 


मिथुन रास (Mithun Zodiac)


या राशीमध्ये बुध दहाव्या भावात उदय होणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यासोबतच कौटुंबिक वातावरण चांगलं राहणार आहे. बेरोजगारांना नोकरीत यश मिळू शकते. मालमत्ता घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करण्याची योजना देखील बनवू शकता. वैयक्तिक आयुष्य देखील चांगलं राहणार आहे.करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या आता संपू शकतात. 


कर्क रास (Kark Zodiac)


या राशीमध्ये नवव्या घरात स्वामीचा उदय होणार आहे. तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं स्पर्धा परीक्षांमध्ये फायदे मिळू शकतात. परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. यशाच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )