Budh Uday In Scorpio: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह अस्त आणि उदय देखील होतात. ग्रहांच्या या हालचालीचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. येत्या काळात ग्रहांचा राजकुमार बुधाचा उदय होणर आहे. जेव्हा एखादा ग्रहाचा उदय होतो तेव्हा तो त्याचा पूर्ण प्रभाव सर्व राशींवर पाडतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार असून त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांना यावेळी अचानक आर्थिक लाभ होणार आहे. जाणून घेऊया बुध ग्रहाच्या उदयामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. 


तूळ रास (Tula Zodiac)


बुध ग्रहाचा उदय तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. तुमच्या राशीतून धनाच्या घरात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात पैशाचा ओघ वाढेल. तसंच तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात नफा मिळू लागणार आहे. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकतं. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशनही मिळू शकते. 


मकर रास (Makar Zodiac)


मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय अनुकूल ठरणार आहे. कारण तुमच्या राशीतून उत्पन्नाच्या घरावर बुध ग्रहाचा उदय होणार आहे. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. पैसे कमावण्यासोबतच त्याची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. तुमच्या महत्त्वाच्या योजना यशस्वी होणार आहेत. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढणार आहे.


कर्क रास (Cancer Zodiac)


बुधाचा उदय तुमच्यासाठी सकारात्मक ठरणार आहे. यावेळी वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. व्यवसायातील नवीन मार्ग खुले होऊ शकतात. रिअल इस्टेट, मालमत्ता, जमीन आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहेत. छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )