Budh Gochar: नोव्हेंबरमध्ये बुध ग्रह करणार गोचर; `या` राशींना मिळणार कमाईची संधी
Mercury Planet Transit In Sagittarius: धनु राशीवर गुरूचं राज्य असून हे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानलं जातंय. त्यामुळे या गोचरचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांना यावेळी करियर आणि व्यवसायात यश मिळू शकणार आहे.
Mercury Planet Transit In Sagittarius: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतात. बुध 27 नोव्हेंबरला धनु राशीत प्रवेश करणार आहे.
धनु राशीवर गुरूचं राज्य असून हे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानलं जातंय. त्यामुळे या गोचरचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांना यावेळी करियर आणि व्यवसायात यश मिळू शकणार आहे. जाणून घेऊया बुध ग्रहाची कोणत्या राशींच्या व्यक्तींवर विशेष कृपा असणार आहे.
कुंभ रास (Kumbh Zodiac)
बुध राशीतील बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. बुध ग्रह तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या घरात भ्रमण करणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसंच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीतूनही लाभ होण्याची चिन्हं आहेत. हे गोचर तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. सुखसोयी मिळविण्याची तुमची इच्छा वाढणार आहे.
कन्या रास (Kanya Zodiac)
ग्रहांचा राजकुमार बुधाचं गोचर तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकणार आहे. जे लोक रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग किंवा प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसाय करतात, त्यांना चांगला नफा मिळू शकेल. लग्नाचीही शक्यता आहे. पद आणि प्रतिष्ठा यांचे फायदे मिळतील. या काळात तुम्हाला चांगली ऊर्जा आणि धैर्य दिसेल. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत.
मेष रास (Aries Zodiac)
बुध ग्रहाचा राशीतील बदल वरदानापेक्षा कमी नसणार आहे. या काळात तुम्हाला योजनांमध्येही लाभ मिळणार आहे. या काळात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरी करणार्यांचे त्यांच्या करिअरमध्ये फायदे मिळविण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागणार आहेत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )