Budh Gochar 2023 : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या निश्चित काळाने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध 28 डिसेंबर रोजी वर्षातील शेवटचं गोचर करणार आहे. बुध ग्रहाच्या या गोचरता सर्व राशींवर परिणाम होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुध हे ज्ञान, बुद्धिमत्ता, भाषण, संवाद, व्यवसाय, व्यावसायिक, क्रियाकलाप आणि सामाजिक यांचा कारक आहे. दरम्यान बुध ग्रहाचं हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया बुध ग्रहाच्या या गोचरचा कोण्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.


कधी करणार बुध ग्रह गोचर?


28 डिसेंबर रोजी सकाळी 10:55 वाजता बुध धनु राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या काळात तो वक्री चाल देखील चालणार आहे. तर 2 जानेवारी रोजी बुध ग्रह मार्गस्थ होणार आहे. 


मकर रास


मकर राशीच्या लोकांना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळू शकणार आहे. मकर राशीच्या लोकांना बुधाच्या राशीत बदलामुळे खूप फायदा होणार आहे. व्यापाऱ्यांना भरपूर नफा होणार आहे. तुमच्या घरात किंवा कुटुंबात काही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी खूप प्रशंसा मिळेल. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.


कुंभ रास


कुंभ राशीच्या लोकांनाही बुध ग्रहाच्या राशीत बदलामुळे खूप फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये दुप्पट फायदा होणार आहे. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ते करू शकता नोकरदार लोकांसाठी हा काळ फायदेशीर आहे. शिवाय व्यवसायातही वाढ होईल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळतील. 


मीन रास


मीन राशीच्या लोकांना बुधाच्या राशीत बदलादरम्यान भरपूर आर्थिक लाभ मिळू शकणार आहेत. नोकरीत बढतीची संधी मिळेल. पैशांची बचत आणि गुंतवणूक या दोन्हीमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वैयक्तिक जीवन आनंददायी राहील. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायातही तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होणार आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )