मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीचं करियर कसं असणार याचे अंदाज बांधले जातात. 12 राशींपैकी 3 राशीच्या व्यक्ती आपल्या करियरमध्ये खूप जास्त प्रगती करतात. त्यांच्या कुटुंबातही चांगलं वातावरण असतं. या 12 राशींपैकी कोणत्या राशींच्या व्यक्ती आयुष्यात आणि करियरमध्ये यशस्वी होतात जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रानुसार या बाबतीत 3 राशीच्या लोकांचे भाग्य विलक्षण असते. ते त्यांच्या कारकिर्दीत खूप यश मिळवतात. विशेषत: या तीन राशींची मुले या राशीच्या मुलींपेक्षा या बाबतीत अधिक भाग्यवान असतात.


मेष : या राशीची मुलं बुद्धिमान आणि साहसी असतात. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स अधिक असतो. त्यामुळे ते कोणतीही जोखीम उचलण्यासाठी तयार असतात. त्याच्या या गुणांमुळे त्याला त्याच्या कारकिर्दीत आणि व्यवसायात खूप प्रगती होते. ते त्यांच्या आयुष्यात खूप पैसा आणि नाव कमावतात. त्यांच्या कुटुंबाला अशा मुलांचा खूप अभिमान वाटतो.


वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्राच्या प्रभावामुळे या राशीची मुलं कलात्मक स्वभावाची असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक विलक्षण आकर्षण असतं. नेहमी विलासी जीवन जगायला आवडतं आणि त्यासाठी भरपूर पैसे कमवावेत असं वाटत असतं. आपल्या कुटुंबाचे नाव रोशन व्हावे यासाठी ते कायम झटत असतात. 


मकर : मकर राशीचा स्वामी शनि आहे. या राशीचे लोक खूप मेहनती असतात. त्यांनी एकदा मनात ठरवलं की ती गोष्टी तडीला नेल्याशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही. आपल्या कामामध्ये खूप प्रगती करतात. त्यांना प्रसिद्धी खूप मोठी मिळते. मान सन्मान देखील त्यांना मोठ्य़ा प्रमाणात मिळतो. कामाचं ठिकाण असो किंवा सामाजिक कार्य ते स्वत:ला झोकून देतात. 


Disclaimer : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.