Vastu Tips Of Mirror: घर बांधताना वास्तुशास्त्राचं पालन केल्यास फायदा होतो. असं असलं तरी वास्तु बांधू झाल्यानंतर काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण घरातील प्रत्येक वस्तुंचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. वस्तुंच्या सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेबाबत माहिती असणं आवश्यक आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी घरात सुख समृद्धी घेऊन येतात. तर काही वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्यास अडचणी कमी होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रानुसार घरातील आरसाही आपलं नशीब पालटू शकतो. त्यामुळे आरसा विकत घेताना काळजी घेणं आवश्यक आहे. घरात आरसा लावण्यापूर्वी आपल्याला त्याची योग्य दिशा माहिती असणं आवश्यक आहे. कारण आरसा चुकीच्या ठिकाणी लावल्यास नकारात्मक उर्जेचा संचार होऊन आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

-घरात आरसा लावण्यासाठी योग्य दिशा माहिती असणं आवश्यक आहे. घरात आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं आवश्यक आहे.


-वास्तुशास्त्रानुसार घरात चुकूनही तुटलेला किंवा धुसर आरसा लावू नये. वेळोवेळी आरशाची सफाई करणं महत्त्वाचं आहे.


-अनेक घरात बेडरुममध्ये आरसा लावलेला असतो. वास्तुशास्त्रानुसार बेडच्या बरोबर समोर आरसा लावू नये. जर बेडच्या समोर आरसा असेल तर झोपण्यापूर्वी झाकून ठेवा. कारण झोपल्यानंतर आरशात प्रतिमा दिसणं अशुभ मानलं जातं.


बातमी वाचा- Gangajal Upay: गंगाजलाचे चमत्कारीक उपाय! जाणून घ्या शुभ-अशुभ कार्यातील महत्त्व


-बाथरुममध्ये चुकूनही तुटलेला आरसा लावू नये. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. तसेच घरात नकारात्म उर्जा पसरते. यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो.


-किचनसमोर किंवा आरशासमोर आरशा लावून नये. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे घरात तणाव निर्माण होऊ शकतो. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)