मुंबई : शरीरावर असणारे तीळ खूप काही सांगून जातात. एक इवलासा तीळ बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सामावत असतो. व्यक्तीच्या स्वभावापासून ते अगदी त्याच्या आजारपणापर्यंत बऱ्याच गोष्टींचा उलगचा या तिळातून होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्र शास्त्रामध्ये तिळाला फार महत्त्वं आहे. चला जाणून घेऊया तिळाचं गुपित... 


गालावरील तीळ- 
ज्यांच्या गालावर तीळ आहे ती मंडळी आकर्षक असतात. पैशांच्या बाबतीत असे लोक नशीबवान असतात. आयुष्यभर त्यांना पैशांची चणचण जाणवत नाही. 



लालसर तीळ - 
शरीरावर असणारा लालसर तीळ रागाचं प्रतीक असतो. शिवाय शरीराला होणाऱ्या वेदनांचंही तो प्रतीक असतो. लाल तीळ असणाऱ्यांना हाडांचे विकार जडतात. 



कपाळावर तीळ- 
कपाळाच्या कोणत्याही भागात तीळ असणं चांगल्या नशीबाची खुण आहे. अशा व्यक्ती फार समजुतदार असता. 



हातांवर तीळ - 
ज्या व्यक्तींच्या हातावर तीळ आहे त्यांना पैशांची चणचण जाणवत नाही. पैसे साठवण्याची चांगली सवयही अशा मंडळींना असते. 



पोटावरील तीळ - 
पोटावर तीळ असणाऱ्या व्यक्ती खाद्यप्रेमी असतात. मुख्य म्हणजे त्यांच्या पानात कायमच चांगलंचुंगलं पडतं. 



अनामिकेवरील तीळ - 
ज्या लोकांच्या अनामिकेवर तीळ असतो त्यांना नाती फारशी चांगल्या पद्धतीनं निभावता येत नाहीत. व्यक्तींपासून दुरावा ठेवत ही मंडळी आयुष्य जगत असतात.