Panchang 28 October 2024 in marathi : आली आली दिवाळी आली...आज दिवाळी पहिला दिवस वसुबारस आहे. त्यासोबत शुभ संयोग म्हणजे रमा एकादशीचं व्रत आहे. आज गाय वासराची पूजा केली जाते. जाणून घ्या वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पंचांगानुसार (Panchang Today) गजकेसरी योग, ब्रह्मयोग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र आज सिंह राशीत भ्रमण करत आहे. (monday Panchang)  


तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. सोमवार हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. आज महादेवासोबत एकादशी असल्याने भगवान विष्णुची पूजा करण्यात येणार आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या.  (monday panchang 28 october 2024 Rama Ekadashi and Vasubaras panchang in marathi diwali 2024 ) 


पंचांग खास मराठीत! (28 october 2024 panchang marathi)


वार - सोमवार 
तिथी - एकादशी - 07:53:22 पर्यंत
नक्षत्र - पूर्व फाल्गुनी - 15:24:19 पर्यंत
करण - बालव - 07:53:22 पर्यंत, कौलव - 21:12:44 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - ब्रह्म - 06:46:01 पर्यंत


वसुबारस तिथी 


आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुबारस साजरी करण्यात येते. पंचांगानुसार द्वादशीची तिथी 28 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 7.35 मिनिटांपासून 29 ऑक्टोबर संध्याकाळी 5.04 मिनिटांपर्यंत असणार आहे.


वसुबारस पूजा मुहूर्त (vasubaras 2024 muhurat)


गोवत्स द्वादशीचा मुहूर्त हा सायंकाळी 05.31 मिनिटे ते 08.09 मिनिटांपर्यंत आहे. पूजा करताना गाय आणि वासराची पूजा केली जाते. विशेष महत्त्व असून या दिवशी उपवास केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते.


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 06:30:35
सूर्यास्त - 17:38:48
चंद्र रास - सिंह - 22:11:16 पर्यंत
चंद्रोदय - 27:36:00
चंद्रास्त - 15:31:00
ऋतु - हेमंत


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:08:12
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - कार्तिक


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 12:26:58 पासुन 13:11:31 पर्यंत, 14:40:36 पासुन 15:25:09 पर्यंत
कुलिक – 14:40:36 पासुन 15:25:09 पर्यंत
कंटक – 08:44:14 पासुन 09:28:47 पर्यंत
राहु काळ – 07:54:07 पासुन 09:17:39 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:13:20 पासुन 10:57:52 पर्यंत
यमघण्ट – 11:42:25 पासुन 12:26:58 पर्यंत
यमगण्ड – 10:41:10 पासुन 12:04:42 पर्यंत
गुलिक काळ – 13:28:13 पासुन 14:51:45 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:42:25 पासुन 12:26:58 पर्यंत


दिशा शूळ


पूर्व


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद


चंद्रबल  


मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)