Money Plant Upay : आपल्याला अनेकांच्या घरात मनी प्लांट दिसून येते. कारण मनी प्लांट असणे हे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे मनी प्लांट बहुतेक घरांमध्ये नक्कीच दिसते.  असे सांगितले जाते की, ज्या घरात मनी प्लांट्स असतात तिथे पैशाची कमतरता नसते. नेहमी सकारात्मकता आणि आनंद आणि समृद्धी असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकवेळा घरात मनी प्लांट ठेवूनही आर्थिक संकट पाठ सोडत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. मनी प्लांट लावण्याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात सांगितलेले काही नियम पाळले पाहिजेत. यासोबतच मनी प्लांटशी संबंधित ट्रिकही वापरल्या जाऊ शकतात. मनी प्लांटच्या या ट्रिक आणि उपायांचे पालन केल्याने पैसे घरात येतात. तसेच तुमच्या आयुष्यात पैसा येण्यासोबतच प्रगतीचा मार्गही खुला होऊ शकतो.  त्यासाठी तुम्ही हा एक उपाय केला पाहिजे.


मातीत 'ही' एक वस्तू ठेवा


- मनी प्लांट लावण्यापूर्वी एक नाणे मातीत ठेवून द्या. याचे जबरदस्त परिणाम मिळतात. त्याचप्रमाणे मनी प्लांटशी संबंधित आणखी काही ट्रिक केल्याने भूरपूर संपत्ती आणि यश मिळू शकते. यासाठी जाणून घ्या मनी प्लांटबाबत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.  


- मनी प्लांट कधीही प्लास्टिकच्या बाटलीत किंवा भांड्यात ठेवू नका. तसेच लोखंडी किंवा टीनच्या भांड्यात ठेवू नये. मातीच्या भांड्यात किंवा काचेच्या बाटलीत किंवा भांड्यात मनी प्लांट लावणे शुभ असते.


- मनी प्लांट लावताना त्याच्या मुळाजवळ लाल रंगाची फित किंवा लाल धागा बांधावा. असे केल्याने धनाची वाढ झपाट्याने होते. 


- मनी प्लांटमध्ये दर शुक्रवारी कच्च्या दुधात पाणी मिसळू ते घाला. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते. त्यामुळे आर्थिक स्थिती लवकर सुधारते. 


- वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट आग्नेय दिशेला लावा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी वाढते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)