Moon Venus Conjunction : चंद्र आणि शुक्राच्या संयोगाने बनणार कलात्मक योग; `या` राशींसाठी नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग!
Moon Venus Conjunction : काही योगांचा परिणाम मानवी जीवनावर चांगला होतो तर काहींवर वाईट होतो. असाच आता शुक्र आणि चंद्राच्या संयोगाने कलात्मक योग तयार होत आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना याचे सकारात्मक परिणाम मिळू शकणार आहेत.
Moon Venus Conjunction : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने राशी बदल करतो. यावेळी इतर ग्रहांशी युती करून शुभ योग तयार होता. दरम्यान काही योगांचा परिणाम मानवी जीवनावर चांगला होतो तर काहींवर वाईट होतो. असाच आता शुक्र आणि चंद्राच्या संयोगाने कलात्मक योग तयार होत आहे.
शुक्र आणि चंद्र हे दोन्ही शांत ग्रह असून जेव्हा शुक्र अनुकूल असतो तेव्हा रहिवाशांना त्याच्या जीवनात आनंद, सुविधा मिळतात. चंद्राची अनुकूलता व्यक्तीला मानसिक शांती देते. या कलात्मक योगाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. मात्र यावेळी काही राशींच्या व्यक्तींना याचे सकारात्मक परिणाम मिळू शकणार आहेत.
मेष रास ( Cancer Zodiac )
कलात्मक योगाची निर्मिती या राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुम्हाला भौतिक सुखे मिळणार आहे. नवी मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. कार्यक्षेत्रात तुम्ही खूप प्रगती कराल. यासोबतच इतर माध्यमातून पैसे मिळू शकतात. या काळात तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त नफा मिळेल. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये आईचं सहकार्य मिळणार आहे.
वृषभ रास (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने कलात्मक योग तयार होऊ शकतो. उपजीविकेच्या साधनांमध्ये वाढ होऊ शकते. बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमची बदली इच्छित ठिकाणी होऊ शकते. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी वरीष्ठ तुमच्यावर खूश असतील.
मिथुन रास (Mithun Zodiac)
कलात्मक योगा या राशीच्या लोकांना अनपेक्षित यश मिळवून देणार आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. नशीब तुमच्या सोबत राहील. या काळात अशा अनेक संधी तुमच्या समोर येतील जेव्हा तुम्ही तुमची आर्थिक स्थिती वाढवू शकता. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )